ब्रेकिंग

युवकांनी तंत्रज्ञानाबरोबर संस्कार जपणे गरजेचे – किसन भाऊ हासे

अमृतवाहिनी आयटीआय मध्ये युवकांशी संवाद

युवकांनी तंत्रज्ञानाबरोबर संस्कार जपणे गरजेचे – किसन भाऊ हासे

युवकांनी तंत्रज्ञानाबरोबर संस्कार जपणे गरजेचे- किसन भाऊ हासे

अमृतवाहिनी आयटीआय मध्ये युवकांशी संवाद
संगमनेर । प्रतिनिधी । नवीन तंत्रज्ञान ही आता काळाची गरज बनली आहे. त्याचा वापर हा करिअर साठी सुद्धा चांगला करता येतो. मात्र नवीन तंत्रज्ञानाच्या आहारी जाताना अनेक जण संस्कार विसरले असून तंत्रज्ञान आणि संस्काराची योग्य सांगड घातल्यास आदर्श नागरिक निर्माण होती म्हणून तरुणांनी तंत्रज्ञानाबरोबर संस्कार जपावे असे आवाहन ज्येष्ठ संपादक तथा महाराष्ट्र पत्रकार संपादक संघाचे अध्यक्ष किसन भाऊ असे यांनी व्यक्त केला आहे.

अमृतवाहिनी आयटीआय मध्ये विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य विलास भाटे हे होते तर व्यासपीठावर नामदेव कहांडळ, संजय कुटे ,बाळासाहेब आहेर, बाबासाहेब जोंधळे, अविनाश डेंगळे, शरद खेमनर, संपत हिरे, सचिन मोरे, संदीप दिघे.,दिनकर पांडे आदी उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी बोलताना किसन भाऊ हासे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्थापन केलेले अमृतवाहिनी शिक्षण संस्था ही आता गुणवत्तेमुळे देशात पोहोचली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका आहे शिक्षणाचे केंद्र ठरला आहे. आयटीआय मधील विद्यार्थ्यांनी तंत्र शिक्षण घेण्याचा चांगला मार्ग निवडला असून करिअरमध्ये यातून मोठ्या संधी मिळणार आहेत. तंत्रज्ञानाची कास धरणे काळाची गरज झाली आहे .मात्र अनेक जण त्यामुळे माणुसकी विसरत चालली आहे .हे चिंताजनक आहे. नवीन तंत्रज्ञान आणि संस्कार यांची जोड घातल्यास आदर्श व्यक्ती तयार होईल. जीवन जगताना चांगल्या आरोग्य महत्त्वाचे आहे. यासाठी व्यायाम गरजेचा आहे. मात्र अनेक जण मोबाईलच्या आहारी गेले असून त्यामुळे अनेकांना व्यसनी जडले आहेत.

जाहिरात

सोशल मीडियाचा वापर मर्यादित केल्यास नक्की फायदा होतो मात्र त्याचा वापर जास्त झाल्यास तोटा होतो. असे सांगताना आई-वडील शेती माती ही नाते आपली जपली पाहिजे. संशोधन आणि जिद्द एकत्र केल्यास तुम्हाला नवीन मार्ग सापडतील. नवीन काहीतरी केले तर यशस्वी म्हणून आपली त्यांना होते म्हणून प्रत्येकाने स्वतःला असामान्य समजू असामान्य असे काम करून आदर्श निर्माण करावा असे आवाहन त्यांनी केले.तर प्राचार्य विलास भाटे म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे व संस्थेच्या विश्वस्त सौ शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी आयटीआय मधून विविध कंपन्यांबरोबर समन्वय केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना थेट नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.  आयटीआय मधील प्रत्येक विद्यार्थ्याजवळ आज दोन नोकऱ्यांची संधी उपलब्ध आहे आगामी काळा सुद्धा राज्यभरातील मोठमोठ्या कंपन्या कॅम्पस इंटरव्यू साठी येणार असल्याचे ते म्हणाले असून आपल्या कार्यकाळामध्ये सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांच्या नोकरी मिळून देण्यासाठी आपण काम केले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
 यावेळी नामदेव कहांडळ यांनीही मार्गदर्शन केले. 
या कार्यक्रमाची प्रास्ताविक प्राचार्य विलास भाटे यांनी केले सूत्रसंचालन सचिन मोरे यांनी केले तर बाळासाहेब आहेर यांनी आभार मानले यावेळी आयटीआय मधील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!