बहादरपूर येथे मोठ्या उत्साहात अखंड हरिनाम सप्ताह सांगता
बहादरपूर येथे मोठ्या उत्साहात अखंड हरिनाम सप्ताह सांगता
कोपरगांव । विनोद जवरे ।
कोपरगांव तालुक्यातील बहादरपूर येथे अखंड हरिनाम सप्ताह हरिकीर्तन व हरिनामाच्या जयघोषात उत्साहात साजरा झाला.श्री.संत सदगुरु गोपाजी बाबांचा पावन भुमित अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन सोमवार दि10/4/2023 ते 17/4/2023 दरम्यान आयोजित करण्यात आले.
पहाटे 4 ते 7 काकड आरती,7 ते 10 ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचन ,सायं. 5 ते 6 हरिपाठ तसेच रात्री 7 ते 9 हरि किर्तन नंतर महाप्रसाद भोजन अशा दैनंदिन कार्यक्रम रूपरेषेतुन हरिनाम भजन किर्तन सोहळा जल्लोषात पार पडला.
ह.भ.प. शिवनाथ महाराज गव्हाणे ( छोटे माऊली ) यांचे काल्याचे कीर्तन पार पडले. यावेळी गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी तसेच ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध ऐतिहासिक ,सांप्रदायिक, पारंपरिक वेशभूषा साकारून हिंदू संस्कृतीचे आगळे वेगळे दर्शन प्रत्येक कीर्तन प्रसंगी दाखवण्यात आले.