आ थोरात यांच्या माध्यमातून तालुक्यातील विकास कामांसाठी 91 लाख रुपये मंजूर
आ थोरात यांच्या माध्यमातून तालुक्यातील विकास कामांसाठी 91 लाख रुपये मंजूर
संगमनेर । विनोद जवरे ।

संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य, शिक्षण, दळणवळण, सिमेंट बंधारे ,रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजना यांसह अनेक विकासाच्या योजना आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने राबविल्या आहेत . सहकारातून समृद्धी निर्माण झालेला हा तालुका राज्यात विकसित असलेल्या पहिल्या पाच तालुक्यांमध्ये गणला जातो.अहमदनगर जिल्हा परिषद सन 2021- 22 या आर्थिक वर्षासाठी पंधरावा वित्त आयोग या योजनेअंतर्गत रायते येथील हनुमान मंदिरासमोर सभा मंडप बांधण्यासाठी 5 लाख रुपये, वाघापूर येथील स्वामी समर्थ केंद्र ते गव्हाळी वस्ती रस्ता मजबुतीकरणासाठी 5 लाख रुपये ,मालूजे ते जुने अंभोरे रस्ता मजबुती करण्यासाठी 7 लाख रुपये, डीग्रस येथील ग्रामपंचायत कार्यालयावरती सभागृह बांधण्यासाठी 8 लाख रुपये, अंभोरे येथे आदिवासी वस्ती रस्ता मजबुती करण्यासाठी 6 लाख रुपये, पिंपरने ते कनोली शिवरस्ता मजबुतीकरण 7 लाख रुपये ,घुलेवाडी कचरा व्यवस्थापन घंटागाडी खरेदीसाठी 5 लाख रुपये, चिखली येथे शिवछत्रपती स्मारक सुशोभीकरणासाठी 5 लाख रुपये, पिंपळगाव कोंजीरा येथे स्मशानभूमी सुशोभीकरण 5 लाख रुपये, वरुडी पठार येथील स्मशानभूमी सुशोभीकरण 4 लाख रुपये, तळेगाव दिघे येथील महादेव मंदिर परिसर सुशोभीकरण 5 लाख रुपये, करुले येथे विठ्ठल मंदिर सभामंडप 5 लाख रुपये, हिवरगाव पावसा खंडोबा मंदिर सुशोभीकरण पेविंग ब्लॉक करण्यासाठी 5 लाख रुपये, निमोन येथे दशक्रिया घाट सुशोभीकरणासाठी 5 लाख रुपये, वरवंडी येथील स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी 5 लाख रुपये, आणि डोळासने येथील ठाकर वस्ती अंतर्गत पाटणवाडी डुबेवाडी हे रस्ता डांबरी करण्यासाठी 9 लाख रुपये असे एकूण 91 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे . या निधीसाठी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी पाठपुरावा केला असून हा निधी मिळाल्याबद्दल वरील सर्व गावातील नागरिक व महिला यांनी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व सर्व संबंधित जिल्हा परिषद सदस्य यांचे अभिनंदन केले आहे ..