ब्रेकिंग

प्रवरा नदीकाठच्या गावांनी सतर्क रहा – डॉ जयश्रीताई थोरात

प्रवरा नदीकाठच्या गावांनी सतर्क रहा – डॉ जयश्रीताई थोरात

प्रवरा नदीकाठच्या गावांनी सतर्क रहा – डॉ जयश्रीताई थोरात

जाहिरात – 7756045359
यशोधन कार्यालयाच्या वतीने नागरिकांना आवाहन
संगमनेर । प्रतिनिधी । भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणाच्या क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे निळवंडे धरणातून 10,000 क्यूसेस पाणी सोडण्यात आली असून आगामी काळात पावसाच्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे म्हणून नदीकाठच्या गावांनी व नागरिकांनी अधिक सतर्क राहावे असे आवाहन युवा काँग्रेसचे अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.

काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयातून नदीकाठच्या नागरिकांना मदतीसाठी सूचना देण्यात आले असून याबाबत अधिक बोलताना डॉ जयश्रीताई थोरात म्हणाले की, यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस होत आहे भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे धरणामध्ये पाण्याची आवक वाढत आहे.शासकीय स्तरावरून निळवंडे धरणातून 10,000 क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून आगामी काळामध्ये हा विसर्ग वाढू शकतो अशी परिस्थिती आहे याचबरोबर आढळा आणि भोजापुर धरण सुद्धा भरले आहे. त्यामुळे या नद्यांमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

ही सर्व परिस्थिती पाहता संगमनेर शहरातील नदीकाठचे नागरिक तसेच नदीकाठच्या गावातील नागरिकांनी अधिक सतर्क रहावे. या नागरिकांच्या मदतीकरता युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तातडीने उपलब्ध असावे असे सांगताना नदीकाठी असलेल्या नागरिकांनी नदीपात्रात काही साहित्य अथवा जनावरे असल्यास ती तात्काळ हलवावी असेही त्यांनी सांगितले. तसेच नदीकाठी आवश्यक मदत लागल्यास तातडीने यशोधन कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहनही करण्यात आले आहे
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!