ब्रेकिंग
मंगळवारी घुलेवाडी येथे युवक काँग्रेसच्या शाखांचे उद्घाटन

संगमनेर । प्रतिनिधी । काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला राहिलेल्या संगमनेर तालुक्यात गाव तेथे शाखा अभियान राबवण्यात येणार असून मंगळवार दिनांक 8 जुलै 2025 रोजी घुलेवाडी येथील विविध शाखांचे उद्घाटन युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.

काँग्रेसचा विचार हा शाश्वत असून राज्यघटना व लोकशाही जपणारा आहे. अहिल्यानगर जिल्हा व संगमनेर तालुका हा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे. युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली गाव तेथे शाखा हे अभियान राबवण्यात येत असून विविध गावांमध्ये युवक काँग्रेसच्या शाखा सुरू करण्यासाठी सर्व युवक उत्साहित आहेत. या अभियानांतर्गत मंगळवार दिनांक ८ जुलै 2025 रोजी सायंकाळी 6 वा. पासून रात्री 8 वाजेपर्यंत घुलेवाडी येथील विविध शाखांचा उद्घाटन समारंभ होणार आहे.तसेच या शाखांच्या उद्घाटनाचा एकत्रित व्यासपीठ कार्यक्रम घुलेवाडी गावठाण येथील हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व्यासपीठावर होणार असून यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह युवा काँग्रेसचे अध्यक्ष कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी या सर्व युवक काँग्रेसच्या शाखांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी घुलेवाडी मधील सर्व युवक कार्यकर्ते महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन घुलेवाडी मधील युवक व ग्रामस्थांनी केले आहे.