ब्रेकिंग
वटसावित्री पौर्णिमेनिमित्त तालुक्यात 1100 वट वृक्षांचे रोपण
वटसावित्री पौर्णिमेनिमित्त दंडकारण्य अभियानातून उपक्रम
वटसावित्री पौर्णिमेनिमित्त तालुक्यात 1100 वट वृक्षांचे रोपण

संगमनेर । विनोद जवरे ।
दंडकारण्य अभियानांतर्गत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी संगमनेर तालुक्यात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त 1100 वटवृक्षाचे रोपण करण्यात आले असून वटवृक्षासह सर्व देव वृक्ष हे सर्वाधिक ऑक्सिजन देणारे असल्याने या सर्व वृक्षांचे नागरिकांनी संवर्धन करावे असे आवाहन मा. नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांनी केले आहे.
दंडकारण्य अभियानांतर्गत तालुक्यातील विविध ठिकाणी वटवृक्षांचे रोपण व पूजन करण्यात आले. तसेच संगमनेर तालुक्यात सौ दुर्गाताई तांबे
यांच्या उपस्थितीत खांडगाव, कर्हे, निमोण, पिंपळे, नान्नज दुमाला, पारेगांव बु, सोनोशी, पोखरी हवेली, मालदाड येथे वट पूजन व वृक्षारोपण करण्यात आले.

या प्रसंगी समवेत सौ.अर्चनाताई बालोडे,सुनंदाताई जोर्वेकर,मिनाक्षी थोरात,बेबीताई थोरात, वंदना गुंजाळ,सुनंदाताई कांदळकर, योती कडलग, हौसाबाई गुंजाळ,ममता गुंजाळ,सामाजिक वनीकरण अधिकारी सोनाली गिरी, मधुकर गुंजाळ, रमेश गुंजाळ, प्रभाकर गुंजाळ, रघुनाथ गुंजाळ,सरपंच भारत गुंजाळ,पंचायत समितीचे अधिकारी बाळासाहेब लावरे, रामराम कडलग, मदन शेवाळे, प्रा. बाबा खरात, बाळासाहेब फापाळे यांसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.याप्रसंगी सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या दंडकारण्य अभियानाचा तालुक्यात मोठा विस्तार झाला आहे. यामध्ये नागरिकांचाही मोठा सहभाग आहे. वटसावित्री पौर्णिमेला भारतीय परंपरेत मोठे स्थान असून यानिमित्त देव वृक्षांची आपण पूजा करतो. हे वृक्ष सर्वाधिक ऑक्सिजन देणारी आहेत. दंडकारण्य अभियानाअंतर्गत आपण प्रत्येक गावात 5 वटवृक्षांचे रोपन करतो. यावर्षीही आपण 1100 वटवृक्षांचे रोपन केले आहे. तालुक्यातील महिला पदाधिकारी यांनी प्रत्येकी 10 याप्रमाणे गावांत वटवृक्षांचे रोपन केले आहे. पुढील पिढ्यांसाठी आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासू नये याकरता सर्वांनी वृक्षांचे रोपण ,संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये पिंपळ, वड ,उंबर ,आंबा, कडूनिंब, चिंच या वृक्षांचे रोपण व संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर महिलांना आपल्या घराचा व सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवून पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धनही करणे गरजे आहे. ग्लोबल वार्मिंगची वाढली समस्या कमी करण्यासाठी सर्वांनी वृक्ष संवर्धन करून हिरवाई निर्माण करावी असे आवाहन त्यांनी केले. तर प्रा. बाबा खरात म्हणाले की, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात व मा.आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दंडकारण्य अभियान ही संगमनेर तालुक्याची रायात ओळखली आहे. या वर्षीही सर्वांनी दंडकारण्य अभियानात सक्रिय सहभाग घेत हिरवी वनराई अधिक समृद्ध करण्यासाठी काम करावे. दंडकारण्य अभियान 6 महिने दिवाळी पर्यंत चालू असणार आहेत तर प्रत्येकान आपल्या वाडी – वस्ती, व गावामध्ये विविध प्रकारचे झाडे लावावी. असे आवाहन सौ.दुर्गाताई सुधीर तांबे यांनी केले आहे. संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात वटवृक्षांचे विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले असून त्याची जबाबदारी स्थानिक नागरिकांवर देण्यात आली आहे.