ब्रेकिंग
शिर्डी पोलीस स्टेशनचे सिंघम नंदकुमार दुधाळ पुन्हा ॲक्शन मोड मध्ये
साई भक्तांच्या गाड्या अडवणाऱ्या पॉलिसीवाल्यांवर पोलिसांनी केली कारवाई
शिर्डी पोलीस स्टेशनचे सिंघम नंदकुमार दुधाळ पुन्हा ॲक्शन मोड मध्ये

साई भक्तांच्या गाड्या अडवणाऱ्या पॉलिसीवाल्यांवर पोलिसांनी केली कारवाई
कोपरगांव । विनोद जवरे ।
शिर्डी हे जगभरातील अनेकांचे श्रद्धास्थान असून साहेबांच्या दर्शनासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक रोज दर येथे येत असतात परंतु गेल्या अनेक वर्षांपासून साई भक्तांची वाढती लूट, वेगवेगळ्या प्रकारचे अवैध धंदे, भाविकांचे छोट्या मोठ्या चोऱ्या यामुळे शिर्डीचे नाव खराब होत चालले आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शिर्डी पोलिसांनी आपली वक्रदृष्टी या अवैध धंदेवाल्याकडे वळवत गेल्या काही दिवसापासून कारवाई सुरू केल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे.

अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या शिर्डी पोलीस पथकाने नुकतीच जगभरातून शिर्डीत साईबाबाचे दर्शनाकरिता आलेल्या भाविकांच्या गाड्या मंगळवारी ६ जून रोजी लक्ष्मीनगर ते साई मंदिर गेट नंबर १ या परिसरात आडवून त्यांना साईबाबांचे लवकरात लवकर दर्शन करून देतो, आमच्या दुकानावर हार प्रसाद किंवा इतर तत्सम वस्तू घ्या गाडी इथेच पार्किंग करा अशा एक ना अनेक कारणाने जबरदस्तीने आडून लुटणाऱ्या आठ पॉलिसीबहादरांवर शिर्डी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.या कारवाईत किसान सुखदेव गायकवाड राहणार जेऊर कुंभारी, अल्ताफ फारुक शेख राहणार राहाता, आकाश बाळू शिंदे राहणार रामपूरवाडी, विलास मारुती शिंदे राहणार रामपूरवाडी, सनी अशोक माळी राहणार शिर्डी, दिगंबर राजेश जोशी राहणार राहाता, प्रवीण कुमार राज विजय खरवार राहणार शिर्डी, अक्षय बाळासाहेब घोडके राहणार शिर्डी यांच्या विरुद्ध पोलीस हेडकॉन्स्टेबल सुलोचना अशोक गवांदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर४४५/२०२३ भादवी कलम ३४२ प्रमाणे मंगळवार दि ६ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार माघाडे हे करत आहे.
मंदिर परिसरामध्ये जे पॉलिसीवाले एजंट फिरतात त्यांच्यावर जर दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले तर त्यांच्यावर ही तडीपारची कारवाई केली जाणार – पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ