गणेश निवडणुकीत आ.थोरात- कोल्हे गटाने विखे गटाचा केला धुव्वा
गणेश कारखान्यात आ थोरात- कोल्हे गटाला 18 तर विखे गटाला फक्त 1 जागा
गणेश निवडणुकीत आ.थोरात- कोल्हे गटाने विखे गटाचा केला धुव्वा
गणेश कारखान्यात आ थोरात- कोल्हे गटाला 18 तर विखे गटाला फक्त 1 जागा
कोपरगांव । विनोद जवरे ।
राहता तालुक्याची कामधेनु असलेल्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व युवा नेते विविध भैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वावर गणेश परिसरातील सभासदांनी सार्थ विश्वास ठेवून श्री गणेश परिवर्तन पॅनलचे 18 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय केले असून विखे गटाला अवघ्या 1 जागेवर समाधान मानावे लागले आहे.
राज्यभराचे लक्ष लागलेल्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी उठली होती. काँग्रेस पक्षाचे नेते व सहकारातील आदर्श नेतृत्व आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रथमच गणेशच्या निवडणुकीत लक्ष घातले. युवा नेतृत्व विवेक भैय्या कोल्हे व आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली गणेश परिवर्तन पॅनेलने सत्ताधारी विखे गटाला प्रचारातच घाम फोडला होता. आमदार थोरात यांच्या नेतृत्वावर सभासदांनी मोठा विश्वास ठेवला असून विखे गटाचे पानिपत केले आहे. श्री गणेश परिवर्तन पॅनल कडून ऊस उत्पादक संघातून *शिर्डी गटामधून*-डांगे बाबासाहेब दादा, दंडवते विजय भानुदास, *राहता गटातून*- मा. चेअरमन ॲड. नारायणराव ज्ञानेश्वर कारले, गंगाधर पांडुरंग डांगे ,व संपत कचरू हिंगे, *अस्तगाव गटातून*-गोरडे महेंद्र चांगदेव, चोळके बाळासाहेब पुंडलिक, नळे नानासाहेब काशिनाथ, *वाकडी गटातून*- फोपसे अरुंधती अरविंद, लहारे सुधीर वसंतराव, शेळके विष्णुपंत शंकर ,*पुणतांबा गटातून* -गाढवे अनिल सोपान, चौधरी संपत नाथाजी *इतर मागासवर्गीय मतदार संघातून*- टिळेकर अनिल राजाराम *अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून*- कापसे अलेश शांतवन ,*भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून*- सातव मधुकर यशवंतराव, *महिला प्रतिनिधी मतदार संघातून*- गोंदकर शोभाताई एकनाथ, धनवटे कमलबाई पुंडलिक हे 700 मताच्या आसपासच्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहे. तर सहकारी संस्थांमधून विखे गटाला एक जागा मिळाली आहे.
सकाळपासूनच मतमोजणीवर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. थोरात कोल्हे गटाच्या उमेदवारांच्या विजयाची आघाडी होताच सर्वत्र गुलाबाची उधळण सुरू झाली. ढोल ताशांचा गजर व आमदार बाळासाहेब थोरात जिंदाबाद च्या घोषणा देण्यात आला.सत्ताधारी विखे गटाला सभासदांनी यावेळी मोठी चपराक दिली असून सहकारातून समृद्धी निर्माण करणाऱ्या संगमनेर व संजीवनी पॅटर्न सभासदांनी कौल दिला आहे.या सर्व विजयी उमेदवारांची राहता येथील वीरभद्र मंदिराच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सभेत सत्कार करण्यात आला.या विजयी उमेदवारांचे काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैय्या कोल्हे, आमदार निलेश लंके, आमदार आशुतोष दादा काळे, मा. आ. डॉ सुधीर तांबे, माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे, बिपिन दादा कोल्हे, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
राहता मध्ये आमदार थोरात व विवेक कोल्हे यांची भव्य मिरवणूक
गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विजयाचे शिल्पकार ठरलेले काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात व युवा नेते विवेक भैय्या कोल्हे यांची कार्यकर्त्यांनी राहत्या मधून भव्य मिरवणूक काढली. यावेळी ढोल ताशांचा गजर ,फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत उपस्थित आणि जल्लोष केला =मिरवणुकीमध्ये असलेली नागरिक महिला व युवक आणि सभासद यांची प्रचंड गर्दी ही सर्वांचे लक्ष वेधून घेत होती