वारकऱ्यांना पाणी औषधासाठी करावी लागते वन वन
अनेक समस्यांचा सामना करत वारकरी निघाले पंढरपूरला
वारकऱ्यांना पाणी औषधासाठी करावी लागते वन वन
संगमनेर । विनोद जवरे ।
श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीमध्ये हजारो वारकरी असून या वारकऱ्यांना शासनाकडून पिण्याचे पाणी आरोग्य सुविधा अशी कुठल्याही प्रकारची सुविधा मिळत नाही. त्यामुळे अनेक समस्या सहन करत या वारकऱ्यांना पंढरपूरकडे चालावे लागत असून सरकारने तातडीने पाण्याची टँकर उपलब्ध करून द्यावी अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. अहमदनगर पंढरपूर रस्त्यावर मिरज येथे या वारीतील अनेक वारकऱ्यांनी आपल्या व्यथा माध्यमांसमोर मांडल्या. यामुळे सरकारने जाहीर केलेल्या वारकऱ्यांसाठी सुविधा बुरखा फाडला गेला आहे. अहमदनगरचे पालकमंत्री यांनी वारकऱ्यांना आरोग्य पाणी निवासासह विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या झाल्या असल्याचे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात या वारकऱ्यांना पाणी सुद्धा मिळत नाही. यातील अनेक वारकरी, वयोवृद्ध व गरीब असून त्यांना पाण्याची गरज असते मात्र पैसे अभावी त्यांना पाणी सुद्धा मिळत नाही
हरिभक्त परायण जोंधळे महाराज म्हणाले की वारीला हजारो वर्षाची परंपरा असून ही महाराष्ट्राची आध्यात्मिक संस्कृती आहे. वारकऱ्यांना विविध सुविधा सरकारने दिल्या पाहिजे .परंतु पिण्याचे पाणी सुद्धा मिळत नाही त्यामुळे या दिंड्यांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, तात्काळ मिळावी अशी मागणी त्यांनी केली असून ही सुविधा न मिळाल्यास वारीमध्येच थांबून रास्ता रोको केला जाईल असा खणखणीत इशाराही दिला आहे