ब्रेकिंग

जयहिंद लोकचळवळच्या माध्यमातून राज्यस्तरीय युवा शेतकरी पुरस्कार सोहळा तसेच शेतकरी मेळावा लवकरच – आ.सत्यजीत तांबे यांची माहिती

जयहिंद लोकचळवळच्या माध्यमातून राज्यस्तरीय युवा शेतकरी पुरस्कार सोहळा तसेच शेतकरी मेळावा लवकरच – आ.सत्यजीत तांबे यांची माहिती
संगमनेर । विनोद जवरे ।
मागील अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जयहिंद लोकचवळीच्या माध्यमातून शेतकरी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या राज्यभरातील युवा शेतकऱ्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या पुरस्कारासाठी कृषी क्षेत्रातील तसेच कृषी पूरक व्यवसाय (शेळीपालन ,कुक्कुटपालन, गोपालन, कृषी प्रक्रिया क्षेत्र व इतर कृषी अंगीकृत व्यवसाय) यामध्ये उत्कृष्ट नियोजन करून दिशादर्शक प्रकल्प केलेल्या शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. देशात आजही सुमारे 55 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असते. निसर्गाची अनियमितता, कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ असे सतत चाललेले दृष्टचक्र व काही चुकीची कृषिधोरणे, विशेषतः निर्यातीचे धोरण (भावाची कधीही शाश्वती नसणे) अशा विविध संकटाना शेतकरी सतत तोंड देत असतो. तसेच, घटती उत्पादकता व वाढता उत्पादन खर्च यामुळे देखील शेतीचे अर्थकारण सातत्याने बिघडत चाललेले आहे. तथापि कृषी क्षेत्रात काही ठोस उपाययोजना केल्यास शेती आपले बलस्थान होऊ शकते असे मत आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केले. राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जयहिंद लोकचळवळचे संस्थापक अध्यक्ष डॉ सुधीर तांबे यांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रासह सुदृढ ग्राम, क्रीडा, आरोग्य, उद्योग व स्वयंरोजगार, वाचनचळवळ यांसारख्या अन्य 15 क्षेत्रात देखील कार्य करत आहेत, आपण समाजाचे काहीतरी देण लागतो, सुदृढ समाजाच्या निर्मितीचे आपण भागीदार बनले पाहिजे या भावनेने आमदार बाळासाहेब थोरात व डॉ.सुधीर तांबे यांनी 22 वर्षांपूर्वी जयहिंद लोकचळवळची स्थापना केली.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!