ब्रेकिंग
आ थोरात यांचे नेतृत्व व संगमनेरचा विकास राज्याला दिशादर्शक- पंजाबराव डख
18 ते 24 जुलै अ.नगर जिल्ह्यात चांगला पाऊस होणार
आ थोरात यांचे नेतृत्व व संगमनेरचा विकास राज्याला दिशादर्शक- पंजाबराव डख

18 ते 24 जुलै अ.नगर जिल्ह्यात चांगला पाऊस होणार
संगमनेर । विनोद जवरे ।
निसर्गचक्र हे 22 दिवसांनी पुढे ढकलले असून यावर्षीही राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होणार आहे. 12 ते 14 जुलै संगमनेर तालुक्यात पाऊस होणार असून 18 जुलै ते 24 जुलै या काळात अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिला असून काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे सर्वमान्य नेतृत्व व संगमनेरचा विकास हा राज्याला दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

यशोधन जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट प्रसंगी ते बोलत होते यावेळी कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी मुख्याधिकारी श्रीराम कुऱ्हे, पी वाय दिघे, अनिल सोमणी, नामदेव कहांडळ, गोरक्षनाथ वर्पे , विजय हिंगे, प्रा. बाबा खरात, संजय कोल्हे आदींसह विविध पदाधिकारी कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी यशोधन कार्यालयाच्या कामकाजाची पद्धती त्यांनी समजून घेतली.

यावेळी बोलताना डख म्हणाले की, यंदा पाऊस उशिरा सुरू झाल असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. मात्र काळजी करण्यासारखे काहीही कारण नाही .दरवर्षी 22 दिवसांनी हवामान पुढे ढकलले असून यावर्षी सप्टेंबर -ऑक्टोबर मध्ये राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होणार आहे .तर 12 ते 14 जुलै या काळात संगमनेर व परिसरात आणि 18 जुलै ते 24 जुलै या काळात अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल असा अंदाज त्यांनी वर्तवला.यावर्षी उत्तर भारतामध्ये पावसाने नदी नाले तुडुंब झाले असून मागील वर्षी सारखा महाराष्ट्रातही अत्यंत समाधानकारक व चांगला पाऊस होणार आहे.

काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात हे विदर्भ ते कोकण या सर्व विभागांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. शेती, सर्वसामान्य माणूस यांच्या निगडित प्रश्नांची त्यांना जाण असून त्यांच्या नेतृत्वाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रसह आपल्याला कायम आदर राहिला आहे. जनसामान्यांची कामे करताना 24 तास अविरत सेवा देणारे यशोधन कार्यालय हे अभिनव कार्यालय असल्याचे ही त्यांनी सांगितले. तर कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, पाऊस आणि पंजाबराव डख हे एक समीकरण झाले असून शेतकऱ्यांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण होते की काय अशा परिस्थिती असताना त्यांनी यावर्षी चांगला पाऊस होणार ही सुखद वार्ता दिल्याने सर्वांसाठी आनंदाची बाब असल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी उपस्थित तरुणांनी व कार्यकर्त्यांनी सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली