ब्रेकिंग
शिर्डी पोलीस ठाण्यातील बेवारस वाहनांचा २५ जुलै रोजी लिलाव
शिर्डी पोलीस ठाण्यातील बेवारस वाहनांचा २५ जुलै रोजी लिलाव

कोपरगांव । विनोद जवरे ।
शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत वेगवेगळ्या कंपनीच्या मोटारसायकल बेवारस स्थितीत मिळालेल्या आहेत. या बेवारस मोटार सायकलींचा २५ जुलै २०२३ रोजी जाहीर लिलाव करण्यात येणार आहेत. लिलावात बोलीसाठी भंगार विकेत्यांनी सहभागी व्हावे. असे जाहीर आवाहन शिर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षकांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बेवारसस्थितीत आढळून आलेल्या मोटार सायकल मालकाचा शोध घेतला परंतु मोटार सायकल मालकाचे नाव व पत्ता मिळालेला नाही. सदर मोटार सायकल या शिर्डी पोलीस स्टेशन आवारात लावलेल्या असून मोटार सायकल जाहीर लिलाव पोलीस स्टेशन आवारात करण्यात येणार आहे. सदर लिलावात भाग घेणाऱ्यांनी सकाळी १० वाजता शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर रहावे. लिलाव बोली पद्धतीने होईल. लिलावात जास्तीत जास्त रुपये रक्कम बोलणाऱ्याला लिलाव देण्यात येणाऱ्या मोटारसायकल या भंगारात विक्री साठी होणार आहे. जाहीर लिलावात भाग घेणाऱ्या ईच्छुकांनी आपले भंगारचे लायसन्सचे झेरॉक्स प्रतिसह शिर्डी पोलीस स्टेशनला हजर रहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.