ब्रेकिंग

आ. बाळासाहेब थोरात यांचे हस्ते  म्हाळुंगी नदीचे जल पूजन

आ. बाळासाहेब थोरात यांचे हस्ते  म्हाळुंगी नदीचे जल पूजन

संगमनेर । विनोद जवरे ।

नुकत्याच  झालेल्या पावसामुळे अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणारे भंडारदरा, निळवंडे ,भोजपूर ,आढळा धरणात पाण्याची मोठी आवक झाली आहे. भोजापुर धरण भरल्याने म्हाळुंगी  नदीत चांगले पाणी आले  असून  या ओव्हर फ्लोच्या पाण्याचे पूजन मा. महसूल कृषी व पाटबंधारे मंत्री मंत्री आ बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. गुंजाळवाडी , राजापूर  येथील  म्हाळुंगी नदीच्या  पाण्याचे पूजन  विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले यावेळी जि. प सदस्य आर . एम . कातोरे  संतोष हासे, बाबासाहेब गायकर , नवनाथ अरगडे, राजापूरच्या सरपंच शैला हासे, प्रदीप हासे, नरेंद्र गुंजाळ, , माचीन्द्र गुंजाळ, रमेश गुंजाळ, मधुकर गुंजाळ आदिंसह ग्रामस्थ व महिला भगिंनी उपस्थित होत्या.

सह्याद्री पर्वतला रांगातील पाचपट्टा, पट्टा किल्ला खोऱ्यात चांगला पाऊस झाल्याने भोजापूर धरण भरले आहे.. या धरणाचे ओव्हर फ्लो चे पाणी प्रवरा नदीला मिळाले असून राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणी केलेल्या साठवण बंधाऱ्यांमुळे पश्चिम भागातील हे बंधारे ओव्हरफ्लो होऊन हे पाणी चिखलीमध्ये आले आहे. याप्रसंगी आमदार थोरात म्हणाले  की, मागील काही  दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे सह आढळा भोजापुर धरणात चांगले पाणी आले आहे. आढळा धरण हे अगोदर पूर्ण भरले असून भोजापूर धरणही पावसाळ्याच्या उत्तरार्धात भरले आहे .हे शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंददायी आहे. पश्चिम भागात आढळा व म्हाळुंगी नदीवर आपण  साखळी बंधारे निर्माण केले आहेत .यामुळे पाण्याची साठवण मोठी होत असून त्याचा फायदा या भागातील नागरिकांना होत असतो. जल पूजन हा एक आनंदाचा क्षण असल्याचे ही ते  म्हणाल्या तर आर . एम कातोरे म्हणाले की ,पश्चिम भागात आमदार बाळासाहेब थोरात यांनी जेथे जागा असेल त्या ठिकाणी नदी, नाले, ओढे यावर सिमेंट बंधाऱ्यांचे मोठे जाळे निर्माण केले आहे .यामुळे पाण्याची मोठी साठवण होत असून या भागात समृद्धी निर्माण झाली आहे. पाण्याचा काटकसरीने वापरही होणे अत्यंत गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी नदीला साडी चोळी अर्पण करण्यात आली या जलपूजनाचे नागरिकांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!