ब्रेकिंग

भरडधान्य  दुर्लक्षित परंपरागत अन्नस्रोत – डॉ. संजय औटी.

थोरात महाविद्यालयात भरड धान्यावर आधारित पोस्ट स्पर्धा संपन्न

भरडधान्य  दुर्लक्षित परंपरागत अन्नस्रोत – डॉ. संजय औटी.


संगमनेर । विनोद जवरे ।
मिलेटधान्य अथवा भरडधान्य हे आशिया आणि आफ्रिका या खंडातील देशांच सांस्कृतीक आणि
पारंपारिक अन्नधान्य होते: निम्म्यापेक्षा जास्त मिलेटचा वापर आपल्या दैनंदिन अन्नामध्ये करत होते. मिलेट म्हणजेच भरडधान्य किवां यालाच तृणधान्य असे संबोधले जाते. भरडधान्य ( मिलेट ) एक दुर्लक्षित परंपरागत अन्नस्रोत असल्याचे प्रतिपादन नाशिक येथील एचपीटी महाविद्यालयाचे वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय औटी यांनी केले आहे.  सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कला वाणिज्य व  विज्ञान महाविद्यालयात भरड धान्यावर आधारित पोस्ट स्पर्धेच्या आयोजन प्रसंगी व्याख्यानात ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, उपप्राचार्य विलास कोल्हे, उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ, IQAC समन्वयक डॉघायवट,सर्व विभाग प्रमुख व शिक्षक उपस्थित होते यावेळी डॉ. संजय औटी म्हणाले कि, प्राचीन काळापासून या अन्नधान्याचा वापर मानव व मानवाने इतर पाळीव प्राणी यांच्या अन्नाचा महत्वाचा स्त्रोत म्हणून वापरले. परंतु हरितक्रांतीच्या काळात शेतक्यांनी नगदी पिके, जास्त उत्पादन देणारी गहु, भात, मका, यासारखी पिके जास्त नफा कमावण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले. त्यामुळेअन्नाधान्य याचा एक महात्वाचा स्रोत ज्यामध्ये अनेक प्रकारचे अन्न घटक जसे फायबर,काल्शिम,आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस, अमिनो अशीड इ. मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळेकुपोषणासारख्या समस्यांवर उपाय मिळू शकतो : पिझ्झा , बर्गर, चायनिज च्या अतिसेवनाचे परीणामतरुणपिढीला माहित असूनही शहरी भागातील अनेक तरुण तरुणी त्याच्या आहारी गेल्याचे दिसून येते.असे प्रतिपादन डॉ. संजय औटी यांनी केले.


   अनेक राज्य सरकार शेतकर्यांना बाजरी, ज्वारी, नाचणी, वरई, सावा , या सारखे तृणधान्य
पिकविण्यासाठी प्रवृत्त करत आहेत आणि ते लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी जनजागृती केली जात आहे.भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला केलेल्या विनंतीनुसार ७२ देशांच्या सहकार्याने भारताने 2023 हेपौष्टिक तृणधान्याचे अंतरराष्ट्रीय पोषक धान्य वर्षे म्हणून घोषित केले. या निमित्ताने जगभर अनेककार्यक्रम आयोजित केले ज्यात आहेत. १० प्रकारच्या पौष्टिक तृणधान्ये लोकांच्या जेवणात घेऊन जावे,हा या आव्हानात्मक कार्याचा महत्वाचा भाग आहे असे डॉ.औटी यांनी सांगितले.तृणधान्यवर आधारीत प्रक्रिया उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात संधी आहेत त्याही तरुणांनाअवगत करणे व तरुणांना स्वताचे छोटे-मोठे व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा ह्याकार्यक्रमाचा उद्देश आहे. या अनुषंगाने संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी भरडधान्यावर आधारीत पोस्टर स्पर्धेचे आयोजन तसेच व्याख्याने आयोजित करणे इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनी या स्पर्धाला मोठा प्रतिसाद दिला, नाशिक येथील एच.पी.टी, आर वाय.के, कॉलेजचे वनस्पतीशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. संजय औटी यांचे एकदिवशीय सेमिनार व मिलेट वर आधारीत प्रदर्शन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!