ऐतिहासिक मिरवणुकीतील…ऐतिहासिक क्षण…
ऐतिहासिक मिरवणुकीतील…ऐतिहासिक क्षण…
कोपरगाव । विनोद जवरे ।
संगमनेरच्या गणेशोत्सवाला 128 वर्षांची प्रदीर्घ परंपरा, दिवसेंदिवस वाढत जाणारा आनंद आणि उत्साह. धार्मिक ऐक्य, गुलाला ऐवजी फुलांची उधळण, लोक संस्कृती जपणारा आणि शांतता व सुव्यवस्थेचा संदेश देणारा हा विसर्जनाचा सोहळा.
धार्मिक विद्वेष आणि अशांतता बाजूला ठेवून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली बरोबर 21 वर्षांपूर्वी संगमनेरकरांनी विसर्जन मिरवणुकीची पद्धत नक्की केली. बरोबर विसर्जनाच्या दिवशी सकाळी आठ वाजता गणरायाची पूजा करून मिरवणुकीला प्रारंभ होतो. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही गेले 21 वर्ष विसर्जन मिरवणुकीला उपस्थित राहण्याची परंपरा सातत्याने जपली.
आजही लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी आदरणीय साहेब व मा.आ.डाॅ.सुधीर तांबे आवर्जून उपस्थित होते. सोमेश्वर मंडळाच्या रंगार गल्ली येथील मानाच्या पहिल्या गणपतीची महाआरती दरवर्षीप्रमाणे आजही सकाळी आठ वाजता साहेबांच्या हस्ते झाली. ढोल ताशांची गर्जना, मर्दानी खेळांचा आनंद आणि सर्व धर्मीयांचा सहभाग… बाप्पांच्या निरोपाचे हे ऐतिहासिक क्षण आजही संगमनेरकरांनी तितक्याच उत्साहाने साजरे केले. याप्रसंगी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, मनीष मालपाणी, सोमेश्वर मंडळाचे जयवंत पवार, किशोर पवार, कैलास बुरसे, सोमेश्वर दिवटे, विश्वासराव मुर्तडक, कैलास लोणारी, मुकुंद गरूडकर, संजय काजळे आदिंसह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी, संगमनेर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.