ब्रेकिंग

सागराचे पर्यावरण धोक्यात आले तर जीवसृष्टी धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही – बोधनकर 

सागराचे पर्यावरण धोक्यात आले तर जीवसृष्टी धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही – बोधनकर 

 संगमनेर । विनोद जवरे ।

सागरापासून आपणास सर्वाधिक म्हणजे ७०प्राणवायू आणि १०० टक्के पाऊस मिळतो पण सहा महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाइतक्या सागरावर प्लॅस्टिक पसरलेले असल्याने  सागरा बरोबरच आपले,पर्यायाने आपल्या पृथ्वीचे आरोग्य धोक्यात आले आहे ‘,असे प्रतिपादन ‘सागरमित्र’ संस्थेचे श्री. विनोद बोधनकर यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब सं.थोरात महाविद्यालय, संगमनेर येथे ‘आढळा नदी संवाद यात्रा’आयोजित ‘प्लॅस्टिक: धोके आणि व्यवस्थापन’ या विषयावरील कार्यशाळेत बोलतांना  काढले.ज्ञानमाता माजी विद्यार्थी स्काऊट संघटना  आणि संगमनेर नगरपालिका व सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात  महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन केले होते.नाशिक पदवीधर  मतदार संघाचे माजी आमदार व संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुधीर ताबे यांनी कार्यशाळेचे उदघाटन केले.संस्थेच्या  सर्व ४२ शाळांमधून हा उपक्रम राबविण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

‘प्लास्टिक वापरात असते तेंव्हा ते सोयीचे वाटत असले तरी ते फेकून दिले की अपायकारक होते.समुद्रातील जीवजंतू, जमिनीवरील प्राणीसृष्टीवर त्याचे गंभीर परिणाम होतात.हा धोका ओळखून आपण आता केवळ जागृती वर न थांबता कृती कार्यक्रम  हाती घेतला पाहिजे  असे सांगून शालेय विद्यार्थ्यांच्या मार्फत त्यांनी फक्त त्यांच्या घरातील कोरडे आणि स्वच्छ प्लास्टिक  शाळांमधून विद्यार्थ्यां मार्फत महिन्यातून एकदा जमा करायचे,त्यासंबंधाने बोधनकर यांनी स्लाईडच्या माध्यमातून मार्गदर्शन  केले.शहर व  आढळा खो-यातील सर्व हायस्कूल मधील शिक्षक प्रतिनिधी यावेळी सहभागी झाले होते.याप्रसंगी संस्थेचे सहसचिव दत्तात्रय चासकर,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दीनानाथ पाटील, उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ,भूगोल विभागप्रमुख डॉ.रवींद्र  गायकवाड,R.F.O.केदार साहेब आणि,मुख्या.सुभाष देशमुख नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल, आगार व्यवस्थापक हांडेसाहेब ,इंजि. बंदावणे, इंजि.संपत देशमुख ,सर्पमित्र सचिन गिरीआणि महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित  होते. आढळा नदी  संवाद यात्रेचे समन्वयक प्रा.विठ्ठल शेवाळे यांनी प्रास्ताविक केले,वायुदलातील माजी अधिकारी व प्रकल्प प्रमुख नारायण उगले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.श्री निवास पगडाल यांनी  आभार मानले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.नानासाहेब दिघे, ग्रीन क्लब चे कार्यक्रम समन्वयक प्रा. महेश गुंजाळ प्रा. नानासाहेब गुंजाळ सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नानासाहेब गुंजाळ यांनी केले

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!