आरक्षणाच्या मागणीसाठी वेस -सोयगाव येथे कँडल मार्च
आज संपूर्ण गाव बंद
कोपरगांव । विनोद जवरे ।
मराठा समाजाला आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी वेस तालुका कोपरगाव येथे काल सायंकाळी कॅन्डल मार्च काढण्यात आला यामध्ये वेस सोयगाव गावातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
” आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे” एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी गाव आणि परिसर दुमदुमून गेला होता.
वेस गावातून पूर्ण फेरी झाल्यानंतर मुख्य वेशीवर आरक्षणाबाबत सर्व समाज बांधवांची भाषणे झाली. या कॅन्डल मार्चमध्ये वेस गावातील सर्व तरुण युवक, चिमुकले ज्येष्ठ ग्रामस्थ तसेच गावातील सर्वपक्षीय ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते