ब्रेकिंग

मराठा समाज आरक्षण मागणीच्या उपोषणास आ.थोरात यांचा पाठिंबा

मराठा समाज आरक्षण मागणीच्या उपोषणास आ.थोरात यांचा पाठिंबा

संगमनेर । विनोद जवरे ।

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ संगमनेर मध्ये सुरू असल्यास साखळी उपोषणास काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी भेट देऊन पाठिंबा दिला असून सरकारने तातडीने आरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.संगमनेर बस स्थानक येथे सुरू असलेल्या मराठा समाज आरक्षण मागणीच्या साखळी उपोषणास आज आमदार बाळासाहेब थोरात यांनी भेट दिली. यावेळी समवेत नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे, नवनाथ आरगडे, सुरेश थोरात, निखिल पापडेजा, लाला बेपारी, दत्ता जोंधळे यांसह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यभरात मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ साखळी उपोषण सुरू आहे. संगमनेर मध्येही हे उपोषण सुरू असून या भेटीनंतर आमदार थोरात म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही जनभावना आहे. मराठा समाजातील अनेक कुटुंब अत्यंत गोरगरीब असून त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण आहे. मराठा समाजात बेरोजगारीचा ही मोठा प्रश्न असून आरक्षणामुळे नक्कीच रोजगारासाठी फायदा होणार आहे. या समाजाच्या आरक्षणाला इतर समाजाचाही मोठा पाठिंबा आहे.गावागावांमध्ये आरक्षणासाठी उद्रेक होत आहे. म्हणून सरकारने वेळीच लक्ष घातले पाहिजे. आवश्यकता असल्यास तातडीने विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाची पूर्तता करून लवकरात लवकर आरक्षण द्यावे.

मनोज जरांगे पाटील यांचे आरक्षणासाठीचे उपोषण आणि तातडीने आरक्षण मिळावे याकरता महाविकास आघाडीच्या वतीने उद्या राज्यपाल यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार असून मराठा आरक्षणाच्या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा.प्रदेशाध्यक्ष व मा.महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.अकोले तालुक्यातील कळस येथे सुरू असलेल्या मराठा आंदोलनासाठीच्या साखळी उपोषणालाही काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी भेट दिली यावेळी समवेत विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे हे ही उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!