ब्रेकिंग
भक्तांसाठी चांगल्या सुविधा व्हाव्यात – आमदार थोरात
आळंदी येथील गंगागिरी महाराज मठाच्या कामाची आ.थोरात यांनी केली पाहणी
भक्तांसाठी चांगल्या सुविधा व्हाव्यात – आमदार थोरात

संगमनेर । विनोद जवरे ।
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सरला बेट यांच्यावतीने आळंदी येथे गुरुवर्य परमपूज्य रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज यांच्या मठाच्या कामाची पाहणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी करून कामाची माहिती घेतली.

आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या समाधीचे दर्शन आमदार बाळासाहेब थोरात यांनी घेतले यावेळी देवस्थानच्या वतीने आमदार थोरात यांचा सत्कार करण्यात आला. तर मठाच्या कामाची पाहणी आमदार थोरात यांनी केली यावेळी विश्वस्त महेंद्र गोडगे पाटील, हरिभक्त परायण मधु महाराज, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, मिलिंद कानवडे , ह भ.प.नवनाथ महाराज आंधळे, बाबासाहेब कांदळकर, सचिन दिघे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

श्री संत योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्यावर व सरला बेटाप्रती आमदार बाळासाहेब थोरात यांची कायम श्रद्धा असून त्यांनी या बेटाच्या कामासाठी सातत्याने मोठी मदत केली आहे. दरवर्षी सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरा होत असून आमटी आणि भाकरी हा प्रसाद देशभरात प्रसिद्ध ठरला आहे. या सप्तांमध्ये हजारो लाखो भावी मोठ्या श्रद्धेने सामील होत भक्ती तल्लीन होऊन जातात.सरला बेट व परिसरातील भाविकांना श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांचे दर्शन व श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे सुविधा व्हावी याकरता सरला बेटाच्या वतीने संत परमपूज्य रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक सुविधा असलेल्या मठ उभारण्यात येत आहे.या मठाच्या कामाची पाहणी आमदार थोरात यांनी केली असून चांगल्या सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी अनेक सूचना केल्या आहेत.

यावेळी आमदार थोरात म्हणाले की , वारकरी संप्रदाय हा सर्वात मोठा असून या संप्रदायाला हजारो वर्षांची परंपरा आहे. सर्व समाज बांधवांना एकत्र ठेवणारा हा समाज असून यामध्ये जात धर्म पंथ गरीब श्रीमंत असा कधीही भेदभाव केला जात नाही. श्री संत योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह हा संपूर्ण महाराष्ट्रात लौकिकास्पद ठरला असून परमपूज्य रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही परंपरा सातत्याने सुरू आहे. श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथे निर्माण होत असलेल्या मठामुळे भाविकांसाठी चांगली सुविधा निर्माण होणार आहे.तर महेंद्र गोडगे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व आमदार बाळासाहेब थोरात यांची सातत्याने सरला बेटा प्रती मोठी श्रद्धा असून या परिवाराने कायम वारकरी संप्रदायाचा विचार जोपासला असल्याचेही ते म्हणाले.