ब्रेकिंग

देवगड अश्वस्पर्धेचा राज्यभर मोठा लौकिक – आ थोरात

अश्व प्रदर्शनात देशभरातून मोठा सहभाग

देवगड अश्वस्पर्धेचा राज्यभर मोठा लौकिक – आमदार बाळासाहेब थोरात


अश्व प्रदर्शनात देशभरातून मोठा सहभाग

संगमनेर । विनोद जवरे ।

घोडा हा माणसाचा आवडता प्राणी असून इतिहास कालीन लढायांमध्ये घोड्यांचे मोठे योगदान राहिले आहे. देखणी जनावर व रुबाबदार घोडी बाळगणे हा नाद असावा लागतो. देवगड येथे होत असलेल्या या अश्व बाजार व प्रदर्शनात देशभरातून मोठ्या संख्येने अश्व दाखल झाले असून या स्पर्धेचा राज्यभरात मोठा लौकिक निर्माण झाले असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

हिवरगाव पावसा, देवगड येथे तालुका अश्वप्रेमी असोसिएशन व शिवराज निर्माण संघटनेच्या वतीने आयोजित भव्य अश्वस्पर्धा अश्वप्रदर्शन व अश्वबाजार उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा. आ. डॉ सुधीर तांबे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, आयोजक रणजीतसिंह देशमुख, सौ दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात ,राजेंद्र चकोर, इंद्रजीत भाऊ थोरात, उत्कर्षाताई रुपवते ,देवस्थानचे अध्यक्ष उत्तम नाना जाधव, सुभाष गडाख, डॉ. प्रमोद पावसे ,डॉ. संदीप पावसे, रफिक फीटर ,मकरंद मुळे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, देवगड हे संगमनेर तालुक्यातील भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. ही यात्रा म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. लहानपणी या यात्रेला आम्ही बैलगाडीतून यायचो. दूध संघाच्या माध्यमातून देवगड परिसरात वृक्षारोपणासह अनेक विकास कामे झाली आहेत. मागील सात वर्षांपासून होत असलेले प्रदर्शन हे राज्य पातळीवर पोहोचले आहे. देशभरातून अनेक अश्वमालक या ठिकाणी येत असतात. देखणी जनावरे, घोडेबाळगणे हा नाद असावा लागतो. शेतकऱ्यांना या जनावरांचे मोठे प्रेम असते. घोडे बाळगणे म्हणजे खर्च ज्यादा असतो .ही हौस असते .अगदी इतिहासात व शिवकाळात घोड्यांचे महत्त्व अनन्यसाधारण राहिले आहे.रणजीतसिंह देशमुख यांच्या पुढाकारातून या ठिकाणी विविध जातींचे घोडे येत असून यामुळे अश्वस्पर्धा व अश्व बाजार असा मोठा मेळा या ठिकाणी होतो.
संगमनेर तालुक्यात निळवंडे चे पाणी आले आहे .उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाणी आल्याने मोठे समाधान आहे. यापुढील काळातही भरपूर पाऊस होऊन निळवंडे दरवर्षी ओरप्लो होऊ दे आणि दोन्हीही कालवे वर्षभर सतत सुरू राहू दे अशी प्रार्थना ही आमदार थोरात यांनी केली असून शेतकऱ्यांनी जास्त उत्पादन केल्यानंतर केंद्र सरकारने कांदा बंदी करून शेतकऱ्यांची पिळवणूक करू नये अशी टीकाही त्यांनी केली.
तर सत्यशील शेरकर म्हणाले की आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल ठरला आहे. तालुक्याची प्रगती ही तेथील जनमाणसांच्या विकासावरून मोजली जाते. लोकप्रतिनिधींनी फक्त समारंभ व भेटीगाठी न करता विकास कामे केली पाहिजे आणि हा मापदंड आमदार थोरात यांनी सर्व तरुण पिढीसाठी घालून दिला असल्याचे ते म्हणाले.तर रणजितसिंह देशमुख म्हणाले की, या अश्रू प्रदर्शनात राज्यभरातून अश्वमालक आपले अश्व घेऊन आले आहेत.सर्वांच्या सहभागातून हे अशुप्रदर्शन यशस्वी होत असून घोडा हा निष्ठावान आणि स्वामीनिष्ठ प्राणी आहे. तो कायम मालकाशी प्रामाणिक राहिला आहे. मात्र सध्याचा होणारा राजकीय घोडेबाजार आणि त्यातून घोड्यांची होणारी बदनामी ही चिंताजनक असल्याची खंतही त्यांनी सध्याच्या राजकारणाबाबत व्यक्त केली. तर मा.आ.डॉ तांबे म्हणाले की रणजीत सिंह देशमुख यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या अश्वप्रदर्शनामुळे संगमनेरचे नाव सारंगखेडा नंतर येत आहे. यावेळी विविध संस्थांचे अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक प्रेमी असोसिएशनचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर डॉ प्रमोद पवसे यांनी आभार मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!