सप्ताहामध्ये दुसऱ्या दिवशी तीन लाख भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
महंत रामगिरी महाराज यांचे प्रवचन संपन्न
सप्ताहामध्ये दुसऱ्या दिवशी तीन लाख भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
कोपरगाव । विनोद जवरे ।
पंचाळे येथे सुरू असलेल्या 10 एप्रिल पासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह तीन लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला
पंचाळे येथे सरला बेटाच्या वतीने 177 वा अखंड हरिनाम सप्ताह 10 एप्रिल पासून सुरू झाला असून या अखंड हरिनाम सप्ताहात भजन अन्नदान किर्तन व प्रवचन हे दैनिक कार्यक्रम होत आहे अन्नदानाची पंगत सकाळी 11 वाजता सुरू झाली ही अन्नदानाची पंगत रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे यामध्ये लाखो भाविकांनी आमटी भाकरीचा महाप्रसादाचा आस्वाद घेतला यावेळी भजन मंडपामध्ये दहा हजार टाळकरी अखंड टाळ मृदंगाच्या तालावर भजन सुरू आहे यामध्ये नाशिक संभाजीनगर अहमदनगर येथील अनेक भक्तगण सामील झाले आहे गावामध्ये प्रचंड प्रमाणात भाविक उपस्थित झाल्याने गावाला मोठ्या उत्साहाचे स्वरूप साजरे झाले आहे सरला बेटाच्या वतीने या सप्ताहाच्या निमित्ताने भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले असून यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांची उलाढाल होत आहे . यामध्ये 500 व्यावसायिक सहभागी झाले आहे तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी भव्य अशा कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये लाखो भाविक कृषी प्रदर्शनास भेट देत आहे एमआयडीसी पोलिसांनी याबाबत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला असून रस्ता वाहतुकीबाबत ते वाहनचालकांना मार्गदर्शन करत आहे तीनशे एकर जागेवर हा सप्ताह असल्याने पार्किंग साठी कुठल्याही प्रकारे अडचण निर्माण झालेली नाही
वावी व शहा रस्त्याने प्रचंड भाविक येत असल्याने एक एक किलोमीटर रस्त्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहे भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून वेळोवेळी आयोजकांकडून उपाय योजना केल्या जात आहे अनेक गावातून आमटी भाकरीचा प्रसाद येत असल्याने त्यांचे ढोल ताशाच्या गजरात त्यांचे स्वागत करून उत्सव समिती समितीचे सदस्य पोपट थोरात, जयराम थोरात ,भरत थोरात ,छबुराव थोरात भाऊसाहेब शेंद्रे यांचे वतीने शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येत आहे स्वागत कक्षावर व देणगी कक्षावर मोठ्या प्रमाणात देणगी रूपाने भाविक देणगी देत आहे सरला बेटाचे महानता रामगिरी महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी जवळपास 400 मीटरची रांग लागली आहे मधुकर महाराज शिवाजी महाराज तळेकर सप्ताह समितीचे अध्यक्ष संभाजी जाधव ज्ञानेश्वर पांगरकर अरुण थोरात कैलास थोरात प्रसाद महाराज कानडे हरी महाराज गवळी हे या सप्ताहाचे नियोजन करत आहे हजारो स्वयंसेवक स्मृतीने या सप्ताहामध्ये भाविकांना महाप्रसाद वाटपाचे काम करत आहे टँकरमध्ये आमटी भरून कोणती मध्ये वाटप केले जात आहे तसेच ट्रॅक्टर मध्ये भाकरी आणून त्या पंक्तीत वाटप केल्या जात आहे अत्यंत सुयोग्य नियोजन असल्यामुळे भाविकांची कुठल्याही प्रकारे अडचण होत नाही अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये हा सप्ताह साजरा केला जात आहे आज सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांचे कुरुक्षेत्रावर प्रवचन झाले यावेळी त्यांनी सरला बेटाचे महत्त्व गंगागिरी महाराजांचे ख्याती व अन्नदान या विषयावर मार्गदर्शन केले या सप्ताहास अनेक नामवंत वारकरी उद्योजक राजकीय सामाजिक पत्रकार यांनी उपस्थिती लावून सप्ताहाच्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले