कष्टातून उभी राहिलेली संगमनेरची आर्थिक समृद्धी प्रत्येकासाठी अभिमानास्पद- आमदार थोरात
आपुलकीने केलेल्या चौकशीने ग्राहक व व्यापारी भारावले
कष्टातून उभी राहिलेली संगमनेरची आर्थिक समृद्धी प्रत्येकासाठी अभिमानास्पद-
आमदार थोरात
आपुलकीने केलेल्या चौकशीने ग्राहक व व्यापारी भारावले
संगमनेर । विनोद जवरे ।
काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या कामातून संगमनेर तालुका हा समृद्ध तालुका म्हणून राज्यात ओळखला जातो. दिवाळीच्या काळात संगमनेरची भरलेली बाजारपेठ हे मोठे वैशिष्ट्य झाले असून खरेदीसाठी शेजारील तालुक्यांसह विविध जिल्ह्यांमधून नागरिक येथे येत असतात. या सर्वांशी अत्यंत जिव्हाळ्याने आमदार बाळासाहेब थोरात यांनी साधल्याने सर्व नागरिक भारावले. याचबरोबर ही समृद्धी सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार थोरात यांनी म्हटले आहे.
दीपावलीनिमित्त आमदार बाळासाहेब थोरात यांनी बाजारपेठ व मेन रोड येथील विविध दुकाने आणि खरेदी करणाऱ्या नागरिकांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. यावेळी समवेत आमदार सत्यजित तांबे,काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, विश्वासराव मुर्तडक, दिलीपराव पुंड ,राणीप्रसाद मुंदडा, किशोर टोकसे ,गणेश मादास ,रिजवान शेख, जीवन पांचारिया ,योगेश जाजू ,सोमनाथ मुर्तडक आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी आ थोरात यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून बाजारपेठेत अत्यंत जिव्हाळ्याने प्रत्येकाची चौकशी केली. विविध कापड दुकान, दीपावलीचे स्टॉल, यांसह विविध दुकानांमध्ये जाऊन व्यापारी व नागरिकांशी संवाद साधला.राज्याचे सर्वात ज्येष्ठ आणि सुसंस्कृत नेते आपल्या सोबत थेट संवाद साधत असल्याने खरेदी करणाऱ्या नागरिकांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समवेत सेल्फी घेण्यासाठी व हात मिळवण्यासाठी मोठी गर्दी केली. यावेळी प्रत्येकाची आनंदाने आणि आपुलकीने आमदार थोरात यांनी चौकशी केली. बाजारामध्ये सुरू असलेल्या खरेदी बाबतही व्यापाऱ्यांकडून जाणून घेतले.याप्रसंगी आमदार थोरात म्हणाले की, सततच्या विकास कामांमधून संगमनेर तालुका उभा राहिला आहे. मागील चाळीस वर्ष एकही दिवस आपण विश्रांती घेतली नाही. सहकार शिक्षण समाजकारण ग्रामीण विकास दुग्ध व्यवसाय यामुळे संगमनेर तालुक्याची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. संगमनेर तालुक्यामध्ये जगभरातील सर्व बँका आणि विविध सर्व मॉल्स असून बँका व पतसंस्थांमधून सुमारे आठ हजार कोटींच्या ठेवी आहेत. मोठा कापड बाजार तर 400 सोन्याची दुकाने आहेत. हे तालुक्याच्या वैभवाचे प्रतीक आहे. बंधूभावाचे वातावरण जिव्हाळा आणि आपुलकी हे संगमनेरचे वैशिष्ट्य असून हे आनंदाचे दिवस आपल्या सर्वांना पुढे न्यायचे आहे. यावेळी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, सुसंस्कृत शहर वैभवशाली शहर ही ओळख आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे असून येथे व्यक्तिदोष कधीही केला जात नाही .सर्वांना सोबत घेऊन सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आपण जपली असल्याने हे मोठे वैभव उभे राहिले असल्याचे ते म्हणाले. यावेळी व्यापारी असोसिएशनचे ओंकार भंडारी म्हणाले की नेतृत्व चांगले असले की ते शहर आणि तिथली आर्थिक समृद्धी चांगली होते. विविध सहकारी संस्थांमुळे बाजारामध्ये मोठे पैसे आल्याने खरेदी विक्री मोठी होत आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठे समाधानातून विश्वासामुळे बाहेरील तालुके व जिल्ह्यातून अनेक नागरिक येथे येत आहे विश्वास ही आपल्या तालुक्याची ओळख असल्याचे ते म्हणाले विविध दुकानांमधून संवाद साधताना अनेक मान्यवरांनी आमदार थोरात यांचा सत्कार केला
सेल्फी साठी मोठी गर्दी
मेन रोडला नागरिक व व्यापाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरात आले आहेत हे समजतात आणि ग्राहक व व्यापाऱ्यांनी या परिसरात मोठी गर्दी केली तरुणाईने सेल्फी साठी तर ज्येष्ठ नागरिकांनी हात मिळवण्यासाठी मोठी गर्दी केल्याने या आनंदाच्या वातावरणात संगमनेरच्या लोक नेतृत्वाला सर्वांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याच्या शुभेच्छा दिल्या.