कोपरगांव विधानसभा निवडणुकीतून 07 उमेदवारांची माघार; 12 उमेदवार निवडणूक लढविणार
कोपरगांव विधानसभा निवडणुकीतून 07 उमेदवारांची माघार; 12 उमेदवार निवडणूक लढविणार
कोपरगाव । विनोद जवरे ।
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत २० उमेदवारानी ३० नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. यातील छाननी प्रक्रिया मुख्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बुधवार दिनांक ३० ऑक्टोबर रोजी पूर्ण झाली होऊन यात दाखल ३० नामनिर्देशन पत्रांमधून १ उमेदवारी अर्ज अवैद्य ठरला होता यातील १९ पात्र उमेदवारांच्या २९ वैद्य ठरलेल्या अर्जाची माघारी घेण्याची मुदत आज सोमवार दि ४ नोव्हेंबर होती आजच्या दिवशी नोंदणीकृत राजकीय पक्षाचे १ व अपक्ष ६ अशा ७ उमेदवारांनी प्रत्यक्षात निवडणूकितून माघार घेतल्याने १२ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहे.
माघार घेतलेल्या उमेदवारांची यादी
राष्ट्रीय समाज पक्ष
शंकर सुखदेव लासुरे (खिर्डी गणेश)अपक्ष
विजय सुभाष भगत (कोपरगाव)
बाळासाहेब कारभारी जाधव (कोकमठाण)
विजय नारायणराव वडांगळे (कोपरगाव)
मनीषा राजेंद्र कोल्हे (पोहेगाव)
राजेंद्र माधवराव कोल्हे (पोहेगाव)
आहिरे प्रभाकर भाऊजी (मोर्विस)
प्रत्यक्षात निवडणूक लढविणारे उमेदवार
राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे ३ उमेदवार
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)
आशुतोष अशोकराव काळे (माहेगाव देशमुख)समाजवादी पार्टी
मेहबूब खान अहमद खान पठाण (कोपरगाव)नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)
वर्पे संदीप गोरक्षनाथ (कोपरगाव )नोंदणीकृत राजकीय पक्षाचे २ उमेदवार (राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यता प्राप्त पक्ष्यांच्या व्यतिरिक्त)
बळीराजा पार्टी
कवडे शिवाजी पोपटराव (कारवाडी कोकमठाण)वंचित बहुजन आघाडी
शकील बाबुभाई चोपदार (महादेव नगर कोपरगाव)
तर अपक्ष ७ उमेदवार
किरण मधुकर चांदगुडे (चासनळी)
खंडू गहिनीनाथ थोरात (जवळके)
चंद्रहस अण्णासाहेब औताडे (पोहेगाव)
दिलीप भाऊसाहेब औताडे (जेऊर कुंभारी)
विजय सुधाकर जाधव (मुर्शतपुर)
विश्वनाथ पांडुरंग वाघ (चितळी, राहता)
संजय भास्करराव काळे (कोपरगाव)