ब्रेकिंग

चहाचा व्यवसाय करत कुटूंब सांभाळणारी आदर्श महिला

चहाचा व्यवसाय करत कुटूंब सांभाळणारी आदर्श महिला
   विनोद जवरे । कोपरगांव ।
कोपरगाव १९ व्या शतकाच्या अखेरपर्यंत स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असे. उपभोग व कष्ट याचे साधन म्हणजे स्त्री असा समज सर्वसाधारण रूढ होता, म्हणूनच समाजात समानतेने वावरणे, संपत्तीवरील अधिकार तसेच शिक्षण किंवा मतदान यासारख्या अधिकारापासून स्त्रिया वंचित होत्या. मात्र १९ व्या शतकाच्या मध्यानंतर आपल्यावर होणारा अन्याय, आपले हक्क, याबाबत स्त्रियांमध्ये सजकता येऊ लागली आणि त्यातूनच स्त्रीवादाचा जन्म झाला.
 पतीचे निधन झाल्यानंतर माझ्यावर आलेली माझ्या तीन मुलींची जबाबदारी आज मी स्पेशल गुळाच्या चहाच्या व्यवसायावर नेटाने पुढे सांभाळत असून कधी-कधी मला माझ्या मुली देखील या व्यवसायात मदत करत असतात त्यामुळे मी आजच्या महिलांना हेच सांगू इच्छिते की, आजच्या स्त्री ने परिस्थितीशी खचून न जाता नेटाने आपल्या पुढे येणाऱ्या अडचणींचा सामना करायला हवा यातून नक्कीच यश मिळते.
कल्पना कहार, चालक श्री गणेश टी हाऊस, कोपरगाव
आजची स्त्री ही कोणत्या क्षेत्रात मागे नसून ती प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसून येत असून त्यातूनच आजच्या स्त्रीने उंच आकाशी गरुड झेप घेतल्याचे आपणास पाहावयास मिळत असून असेच एक उदाहरण म्हणजे कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली गुळाची स्पेशल चहाची टपरी व तेथे गुळाचा चहा बनवून विकणारी एक मध्यमवर्गीय स्त्री. कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी तहसील कार्यालय शेजारी असलेले चहाची टपरी चालवणारे बंडू कहार यांचे कोरोना या आजाराने अंत झाला त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी कल्पना तसेच गौरी, आरती, वेदिका अशा तीन मुली असल्याने घरात कोणी जबाबदार व्यक्ती नसल्याने घरची सर्व जबाबदारी ही मयत बंडू यांच्या पत्नी कल्पना यांच्यावर येऊन ठेपली अत्यंत कमी वयात अचानकपणे नवरा सोडून गेल्याने कल्पना यांच्या वर मुलीच्या उदरनिर्वाहासाठी हाताला मिळेल ते काम करणे गरजेचे होते त्यामुळे त्यांनी इतर काही काम करण्यापेक्षा आपल्या नवऱ्याने तहसील कार्यालय समोर श्री गणेश टी हाऊस नावाने सुरू केलेला चहाचा व्यवसाय पुढे चालवण्याचे ठरवले आणि स्पेशल गुळाचा चहा तयार करत विकण्याचा व्यवसाय सुरू केला परंतु तहसील कार्यालय परिसरात तालुक्यातील प्रत्येक भागातून येणाऱ्या पुरुषांचा मोठा वावर होता त्यामुळे या एकट्या स्त्रीला व्यवसाय कसा करावा हा प्रश्न डोळ्यासमोर उभा ठाकला होता परंतु तिने कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता फक्त आणि फक्त आपल्या तीन मुलींच्या उदरनिर्वाहाचा विचार करत इतर काय बोलतील याची तमां न बाळगता अनेक अडचणींचा सामना करत व्यवसाय सुरू ठेवला व आज रोजी दिवसातून किमान ३०० पेक्षा अधिक ग्राहक स्पेशल गुळाचा चहाचा आस्वाद घेऊन जातात यातून मिळणाऱ्या पैशातून ती आपल्या तिन्ही मुलींचा उदरनिर्वाह अत्यंत चांगल्यापणे करत असून आज त्यांचा तिन्ही मुली उच्च शिक्षण घेत असून अचानकपणे नवऱ्याचे निधन झाल्यानंतर घरात हातावर हात ठेवत बसून न राहता स्वतःच्या मुलीचे पालन पोषण करण्यासाठी स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी राहिलेली ही महिला नक्कीच आजच्या महिला वर्गापुढे एक आदर्श उदाहरण म्हणावे लागेल.
सदर महिला पतीच्या निधनानंतर गुळाचा चहा विक्रीच्या व्यवसायावर आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत आहे ही एक कौतुकास्पद बाब असून त्यांचा इतक्याच त्यांचा तिन्ही मुली देखील कष्टाळू, जिद्दी व हुशार आहे. तसेच त्यांचा चहा देखील अतिशय चवदार व उत्कृष्ट आहे.
प्रा. विजय कापसे, ग्राहक
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!