ब्रेकिंग

संगमनेर तालुका हा सुसंस्कृत तालुका म्हणून ओळखला जातो. – बाळासाहेब गायकवाड

गावोगावचे नागरिक प्रचारासाठी एकवटले

संगमनेर तालुका हा सुसंस्कृत तालुका म्हणून ओळखला जातो. – बाळासाहेब गायकवाड

गावोगावचे नागरिक प्रचारासाठी एकवटले

संगमनेर ( प्रतिनिधी ) सुसंस्कृत नेतृत्व आणि तालुका काय असतो ते संगमनेर तालुक्याने राज्याला दाखवले आहे. याउलट दडपशाही निर्माण करणारा राहता तालुका राज्याने नव्हे तर देशाने पाहिला आहे. यावेळी ची निवडणूक आमदार बाळासाहेब थोरात यांना सर्वाधिक मताधिक्य देण्यासाठी तर राहता तालुक्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी असल्याचे रोखठोक प्रतिपादन रिपाई नेते बाळासाहेब गायकवाड यांनी केले आहे.

आश्वी गटामध्ये उमब्री,रहिमपूर, जोरवे,हंगेवाडी येथील सौ. प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ आयोजित विविध बैठकांमध्ये ते बोलत होते.यावेळी समवेत गणपतराव सांगळे, राजेंद्र चकोर, विजय हिंगे, सुरेश थोरात, गीताराम गायकवाड, विक्रम थोरात, भाऊसाहेब शिंदे, मीनानाथ वर्पे, शिवाजी जगताप, सौ शितल उगलमुगले ,दिपाली वर्पे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब गायकवाड म्हणाले की, भाजपा सरकार हे फसवे आहे. जातीच्या नावावर राजकारण करत आहे. समाजात – समाजात भेदभाव निर्माण करत आहे. राज्यघटना आणि लोकशाही मोडू पाहणाऱ्या भाजपचा बिमोड करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. वंचित आघाडी ही भाजपची बी टीम आहे. मत विभाजनासाठी ती काम करत आहे. संगमनेर तालुका हा सुसंस्कृत तालुका म्हणून ओळखला जातो. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाची उंची मोठी असून त्यांना राज्यातून सर्वाधिक मतांनी निवडून देण्यासाठी संगमनेर तालुक्यातील जनतेने निवडणूक हाती घेतली आहे.तर राहता तालुक्यातील अनेक वर्ष सत्ता असूनही विकास खोळंबला आहे. दडपशाही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राहता तालुका हा जातीयवादी नसून पुरोगामी विचारांचा आहे. सौ प्रभावती घोगरे या सर्व सामान्य गृहिणी आहेत. लोकांना परिवर्तन हवे आहे. जरी लोक उघड बाहेर पडत नसले तरी मतपेटीतून मोठ्या प्रमाणात धक्का देऊन सौ.प्रभावती घोगरे यांच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तर गणपतराव सांगळे म्हणाले की, ही परिवर्तनाची लढाई असून सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल आहेत.शेतकरी बेहाल आहे. लाडकी बहीण ही योजना फक्त निवडणुकीपूर्ती होती. फसवणाऱ्या भाजपच्या भूलथापांपासून सर्वांनी सावध राहावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. 28 गावांमधून सौ.प्रभावती ताई घोगरे यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!