ब्रेकिंग

निवडणूका आल्‍या की, बाहेरच्‍या नेत्‍यांना जिल्‍ह्याची आठवण होते – ना.राधाकृष्ण विखे पाटील

निवडणूका आल्‍या की, बाहेरच्‍या नेत्‍यांना जिल्‍ह्याची आठवण होते – ना.राधाकृष्ण विखे पाटील

लोणी । प्रतिनिधी ।

जिल्हा भकास करण्याबरोबरच जिल्ह्याचे पाणी पळवण्याचं काम शरद ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. २००५ साली समन्यायी पाणी वाटप कायदा आणला आणि जिल्ह्याचं वैभव खऱ्याअर्थाने पवारांनी नष्ट केले. विकासात्मक कामासाठी पवारांनी जिल्ह्यासाठी काय योगदान दिले? असा सवाल महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपसिथत करुन, त्‍यांच्‍यावर निशाणा साधला.

शिर्डी मतदार संघातील हनुमंतगाव आणि पाथरे या ठिकाणी आयोजित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की आपण अनेक वर्ष केंद्रात आणि राज्यात नेतृत्व केले. जिल्‍ह्याच्या विकासासाठी कोणतीही भरीव मदत केली नाही. आज तुम्‍हाला गोदावरी कालव्‍यांची आठवण झाली. पण तुम्‍ही ज्‍यांना घेवून फिरता त्‍यांनीच या जिल्‍ह्याच्‍या मानगुटीरव समन्‍यायी पाणी वाटप कायद्याचे भूत बसविले. त्‍यांना कधीतरी एकदा जाब विचारा. त्‍यांच्‍या चुकीमुळेच या जिल्‍ह्याचे पाणी कमी झाले, त्‍याचे परिणाम शेतक-यांना आणि शेती क्षेत्राला भोगावे लागल आहेत. निवडणूका आल्‍या की, बाहेरच्‍या नेत्‍यांना जिल्‍ह्याची आठवण होते, परंतू जिल्‍ह्याच्‍या विकासासाठी कोणतीही मदत आजपर्यंत केली नसल्‍याची टिका त्‍यांनी केली.

बुद्धिभेद करून जनतेला फसवण्याचे काम त्यांनी आता थांबवलं पाहिजे असे सांगतानाच, निळवंडे धरणाचे भूमिपूजन शरद पवार यांनी चार वेळा केले तरीही त्यांना हे धरण पूर्ण करता आले नाही उलट आ.थोरातांनीच त्‍यांच्‍या तालुक्‍यात कालव्‍यांची कामे होवू दिले नाही. अनेक वर्ष तेही मंत्री होते, धरणाच्‍या मुखापासून कालव्‍यांची कामे सुरु होण्‍यासाठी प्रयत्‍न का केले नाहीत. महायुती सरकार आल्‍यानंतर हे काम सुरु झाले. केंद्र आणि राज्‍य सरकारने निधी उपलब्‍ध करुन दिला. कालव्‍यांच्‍या पुढच्‍या कामालाही आता ८०० कोटी रुपयांचा निधी उपलब्‍ध झाला असल्‍याची माहीती ना.विखे पाटील यांनी दिली.

शेतकऱ्यांचे नेते म्हणून आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण काय केले असा सवाल करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, कोविड काळातही आपल्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने जनतेला वाऱ्यावर सोडले. मोदी सरकारने लस देण्याबरोबरच शेतकरी, व्यापारी, सामान्य जनतेला आणि नोकरदारांना देखील विविध योजनेच्या माध्यमातून या संकटात मदत केली.दहशत या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवली जात आहे. परंतू आमच्‍याकडे विकासाची दहशत निश्चित आहे. ती आम्‍ही आमच्‍या कामातून दाखवितो. आज शिर्डी मतदार संघात येवून आमच्‍यावर आरोप करणा-यांनी त्‍यांच्‍या मंत्रीपदाच्‍या काळात शिर्डी मतदार संघासाठी कोणती मदत केली, हे एदा सांगा. महायुती सरकारने तरी, तुमच्‍या तालुक्‍याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्‍ध करुन दिला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!