ब्रेकिंग

शहा १३२ के.व्ही. वीज उपकेंद्रातून पोहेगाव सबस्टेशनला लवकरच वीज पुरवठा

आमदार आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून पोहेगाव सह परिसराचा विजेचा प्रश्न कायमचा सुटला

शहा १३२ के.व्ही. वीज उपकेंद्रातून पोहेगाव सबस्टेशनला लवकरच वीज पुरवठा

जाहिरात मो -7756045359

आमदार आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून पोहेगाव सह परिसराचा विजेचा प्रश्न कायमचा सुटला

कोपरगाव । प्रतिनिधी । कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव व परिसराचा विजेचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी सिन्नर तालुक्यातील शहा येथील १३२ के.व्ही. वीज उपकेंद्राला पोहेगाव सबस्टेशन जोडण्याचे लिंक लाईनचे काम पूर्ण झाले असून शहा वीज उपकेंद्रातून पोहेगाव वीज उपकेंद्राला लवकरच वीजपुरवठा सुरू होवून पोहेगाव व परिसरातील शेतकरी व नागरिकांचा विजेचा प्रश्न आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कायमचा सुटला आहे.

कोपरगाव तालुक्याचा विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात कोळपेवाडी येथे १३२ के.व्ही.ए.चे सबस्टेशन मंजूर करून आणले होते. मात्र २०१४ नंतर हे सबस्टेशन शहा येथे हलविण्यात आले. तरीही या वीज उपकेंद्रावर आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्याचा हक्क अबाधित ठेवून मागील वर्षी हे सबस्टेशन कार्यान्वित होताच तालुक्यातील कोळपेवाडी व चासनळी ही उपकेंद्रे शहा सबस्टेशनला प्राधान्याने जोडून घेऊन आता पोहेगाव वीज उपकेंद्रही शहा सबस्टेशनला जोडले गेले आहे.या शहा सबस्टेशन मधून पोहेगाव सबस्टेशनला अविरत वीज पुरवठा सुरु होण्यासाठी महावितरण कंपनीकडून शहा ते पोहेगाव या दरम्यानच्या सुमारे २१ किलोमीटर लांबीच्या लाईनची तांत्रिक तपासणी पूर्ण झाली असून लोडिंग क्षमता, चार्ज तपासणी तसेच ३३ के.व्ही. उपकेंद्रातील अंतर्गत तपासणीचे काम सुरू असून हे काम दोन दिवसांत पूर्ण होऊन शहा सबस्टेशनमधून पोहेगाव उपकेंद्राला वीजपुरवठा सुरू होणार आहे.त्यामुळे पोहेगाव व परिसरातील शेतकरी, घरगुती वीज ग्राहक तसेच छोटे-मोठे व्यावसायिक यांना नियमित व सुरळीत वीजपुरवठा होणार आहे. विशेषतः कमी दाबाने होणारा वीजपुरवठा, वारंवार रोहित्र नादुरुस्त होणे तसेच शेतकऱ्यांचे वीजपंप जळण्याच्या समस्या कायमच्या सुटणार असल्याने या भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.१३२ के.व्ही.ए.शहा वीज उपकेंद्राला कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव सबस्टेशन लवकरात लवकर जोडावे याबाबत आ. आशुतोष काळे यांनी दोनच दिवसांपूर्वी मुंबईहून मतदारसंघाकडे परतत असतांना दूरध्वनीवरून महावितरणच्या अधिकाऱ्यांना संपर्क शहा विजउपकेंद्राला पोहेगाव सबस्टेशन जोडण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या सूचनेनुसार १३२ के.व्ही.ए.शहा वीज उपकेंद्रावरून पोहेगाव सबस्टेशनला वीज पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे कोपरगाव उपकेंद्रावरील विद्युतभार कमी होणार असून कोपरगाव सबस्टेशन वरून रांजणगाव देशमुख सबस्टेशनला वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे रांजणगाव देशमुख व परिसरातील गावांचा देखील विजेचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. कोपरगाव शहर व इतर उपकेंद्रावरील ग्राहकांनाही पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा होण्यास मदत होईल. तसेच पोहेगाव उपकेंद्रावरून वीजपुरवठा होणाऱ्या परिसरातील अनेक गावांतील कृषी पंप, घरगुती वीज ग्राहक व व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार असून अत्यंत महत्त्वाचा असलेला विजेचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. त्यामुळे पोहेगाव व परिसरातील शेतकरी, व्यावसायिक व नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!