ब्रेकिंग
आ. थोरात यांना संधी म्हणजे संगमनेरला संधी – आमदार सत्यजित तांबे
संगमनेरमध्ये विविध ठिकाणी नागरिकांशी संवाद

संगमनेर । प्रतिनिधी ।
आमदार बाळासाहेब थोरात यांनी हा तालुका आपला परिवार मानला. एकही दिवस विश्रांती न घेता काम केले. तालुक्याचा प्रगतीचा आलेख अधिक उंचीवर नेण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने प्रगतीला जास्त वेग देण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांना राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंत पोहोचवा, आमदार थोरात यांना राज्याच्या नेतृत्वाची संधी म्हणजे संगमनेरकरांना संधी असल्याचे प्रतिपादन विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे. संगमनेर मध्ये , गणेश नगर ,मालदाड रोड, पावबाकी ,घुलेवाडी, विद्यानगर येथील नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर डॉ जयश्रीताई थोरात, दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक, अमर कतारी ,संजय फड यांच्यासह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी समवेत होते

यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, अनेक दिवसांच्या आविश्रांत कामातून हा तालुका उभा राहिला आहे. परंतु काही लोकांना येथील शांतता सुव्यवस्था आणि प्रगती पहावत नाही. म्हणून तालुक्याची घडी मोडण्याचा त्यांचा डाव आहे. उमेदवार डमी जरी असला तरी त्यामागे कोण आहे हे ओळखले पाहिजे. ज्यांना आपल्या तालुक्यात काही करता आले नाही ते या ठिकाणी अडचणी निर्माण करत आहेत मागील अडीच वर्षापासून अनेक कार्यकर्त्यांना खूप त्रास झाला. आणि कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या
धांदरफळ येथील दुर्दैवी घटनेनंतर बाजारपेठ तीन दिवस ठप्प झाली. हे व्यापारी व शहरातील जनतेने ओळखावे. शांतता आणि संयम यामुळे आपल्या तालुक्याची प्रगती आहे. आपण काय माता-भगिनीचा सन्मान केला आहे .नवीन उद्योजकांना प्रोत्साहन दिले. कधीही दडपशाही आपल्याकडे नाही परंतु ती आणण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहे. त्यांना आपल्याला वेळीच रोखायची असून हे आपल्या राजकारणाची संस्कृती आहे आणि ती आपल्याला जपायची आहे

आमदार बाळासाहेब थोरात यांनी ग्रामीण विकासासह संगमनेर तालुका एक आदर्श बनवला आहे .मात्र खऱ्या अर्थाने प्रगती करायचे असेल तर त्यांना राज्याच्या सर्वोच्च पदावर पोहोचवण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. आपल्या नेत्याला सर्वोच्च पोहोचवण्यासाठी आणि राज्यातून एक लाख मताधिक्याने निवडून आणण्यासाठी काम करायचे.तर यावेळी दिलीपराव पुंड म्हणाले की, संगमनेर शहराची प्रगती व वैभव हे आमदार बाळासाहेब थोरात यांच्यामुळे आहे. आपल्यातील मतभेद बाजूला ठेवून सर्वांना तालुक्याच्या अस्मितेसाठी आणि तालुक्याच्या विकासासाठी मोठ्या मताधिक्याने आमदार बाळासाहेब थोरात यांना विजयी करायचे आहे कारण हा विजय आमदारकीसाठी नसून महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदासाठी असल्याने सर्वांनी हा सन्मान मिळवण्यासाठी काम करावे असे आवाहन केले.
यावेळी विविध पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली

ज्येष्ठ नेते शरद पवार 1967 मध्ये बारामतीतून आमदार झाले 78 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थाने बारामतीची प्रगती झाली. तर विलासराव देशमुख १९८० मध्ये प्रथम आमदार झाले मात्र 1999 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर लातूरची खरी प्रगती झाली आणि म्हणून आपल्या तालुक्याची खरी प्रगती आपल्याला करायची असेल तर आपल्या नेत्याला राज्याच्या सर्वोच्च पदावर नेण्यासाठी आपल्या सर्वांनी काम केले पाहिजे असे आमदार सत्यजित तांबे म्हणाले.