ब्रेकिंग

बी. जे खताळ यांचे नातू विक्रम  खताळ यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

बी. जे खताळ यांचे नातू विक्रम  खताळ यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

संगमनेर (प्रतिनिधी) – माजी मंत्री स्वर्गीय बी.जे. खताळ पाटील यांचे नातू विक्रम सिंग खताळ यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून भाजपमध्ये चुकीच्या व्यक्तींकडून सुरू असलेली दडपशाही आणि सत्तेचा गैरवापर हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियंका गांधी यांच्या शिर्डी येथील सभेत विक्रमसिंग खताळ व त्यांच्या पत्नी सौ. शिवांगी खताळ यांनी प्रवेश केला यावेळी  रणजीतसिंह देशमुख, मिलिंद कानवडे आमदार रिटा चौधरी बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते तर धांदफळ येथील सभेमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी सभेत स्वागत स्वीकारून जाहीर प्रवेश केला. बी जे खताळ पाटील हे राज्याचे माजी मंत्री असून त्यांचा वारसा आपण सांभाळत आहे. मात्र त्यांच्या नावाचा वापर करून तालुक्यामध्ये काही खंडणीखोर हे ब्लॅकमेलिंग करत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. आमच्या परिवाराने कायम महिला भगिनींचा सन्मान केला असून धांदरफळ मध्ये झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे.

समोरचा उमेदवार हा महसूल यंत्रणेचा गैरफायदा घेत आहे त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नका असे सांगताना चुकीचे काम या तालुक्यात होता कामा नये. आमदार बाळासाहेब थोरात हे राज्याचे नेते आहेत सुसंस्कृत तालुका म्हणून त्यांनी राज्याला ओळख करून दिली आहे की परंपरा आपण जपायची आहे.रचनात्मक कामाला पाठिंबा देण्यासाठी आपण आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत असून बी जे खताळ पाटील यांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांना वेळीच जागा दाखवा असे आवाहन त्यांनी केले.विक्रम खताळ यांचे काँग्रेस पक्षामध्ये आमदार बाळासाहेब थोरात, डॉ. जयश्रीताई थोरात, रणजितसिंह देशमुख, मिलिंद कानवडे ॲड माधवराव कानवडे ,पांडुरंग पाटील घुले, संपतराव डोंगरे , आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!