ब्रेकिंग

सर्वसामान्य जनतेची प्रामाणिक सेवा हे पुढील पाच वर्षात उद्दिष्ट – सौ.घोगरे

निळवंडेचे पाणी लाभ क्षेत्रात सर्वत्र देण्यासह साई संस्थांचे प्रश्न सोडवणार

सर्वसामान्य जनतेची प्रामाणिक सेवा हे पुढील पाच वर्षात उद्दिष्ट – सौ.घोगरे

निळवंडेचे पाणी लाभ क्षेत्रात सर्वत्र देण्यासह साई संस्थांचे प्रश्न सोडवणार

शिर्डी  ( प्रतिनिधी ) मी शेतकरी कन्या असून मला राजकारणातून काही मिळवायचे नाही. किंवा संस्था उभ्या करायच्या नाही. तालुक्यातील जनतेला दडपशाहीतून मुक्त करून स्वातंत्र्य देण्याबरोबर पुढील पाच वर्षांमध्ये निळवंडेचे पाणी लाभ क्षेत्रात देणे,संस्था कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे आणि सर्वसामान्य जनतेची प्रामाणिकपणे सेवा करणे हे माझे उद्दिष्ट असून दडपशाहीला हटवण्यासाठी पाठिंबा द्या असे आवाहन सौ.प्रभावती घोगरे यांनी केले आहे.

अस्तगाव, एकरूखे, पिंपरी, आडगाव, राहाता, गणेश नगर, आडगाव, उबरी बाळापुर या परिसरात नागरिकांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी सचिन चौगुले, शितल उगलमुगले,निलेश शेळके,नानासाहेब शेळके, सौरभ शेळके, नितीन सारबंदे,सौ.मनीषा उंबरकर, सरपंच सौ.अर्चना भुसाळ आदी समवेत होते.याप्रसंगी बोलताना सौ.घोगरे म्हणाल्या की, महायुती सरकार हे दगाबाजी करून राज्यात आले आहे. आणि आपल्या सत्ताधाऱ्यांनी नेहमी जनतेशी गद्दारी करून सत्तेसाठी पक्ष बदलले आहे.यांनी दडपशाही व्यतिरिक्त काही केले नाही. लाडक्या बहिणीची योजना हे सांगतात आणि एका महिलेला अडचणीत आणण्यासाठी सर्व उद्योग करतात. पण तालुक्यातील जनतेने आता यांना ओळखले आहे. जनता पाठीशी आहे. परिवर्तनाची मोठी लढाई मी लढत आहे ही माझी एकटीची लढाई नसून सर्वसामान्य नागरिकांची लढाई आहे. त्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

तर सचिन चौगुले म्हणाले की, शिर्डीच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. कारण एक महासत्ता विरुद्ध एक शेतकरी अशी ही लढाई आहे आणि शेतकरी महिला यांची दडपशाही उकडून टाकणार आहे. आता कुणीही न घाबरता सर्वांनी सौ.प्रभावती ताई घोगरे यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.तर नानासाहेब शेळके म्हणाले की, शिर्डीमध्ये परिवर्तन नक्की होणार असून सौ.घोगरे यांना पाठिंबा देण्यासाठी देशाच्या नेत्या प्रियंका गांधी उपस्थित राहिल्या. त्यामुळे सर्वांनी घोगरे यांना पाठिंबा द्यावा असे आवाहन केले. गावोगावी नागरिकांनी सौ.प्रभावती घोगरे यांना मोठा पाठिंबा दिला असून तालुक्यात परिवर्तन नक्की होणार असल्याचे चित्र सर्वत्र निर्माण झाले असल्याचे शितल उगलमुगले यांनी म्हटले आहे.या संवाद यात्रेला सर्व गावांमधून मोठा प्रतिसाद मिळाला

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!