ब्रेकिंग
वाहनचालकांनी ऑनलाईन कर भरण्याचे आवाहन

वाहनचालकांनी ऑनलाईन कर भरण्याचे आवाहन
वाहनचालकांनी ऑनलाईन कर भरण्याचे आवाहन
शिर्डी । विनोद जवरे ।
श्रीरामपूरमध्ये १७ मार्चपासून राबविण्यात येणाऱ्या विशेष तपासणी मोहिमेत थकीत कर असलेल्या वाहनांवर कारवाई केली जाणार असून वाहनमालकांनी थकीत करांचा ऑनलाईन भरणा करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले आहे.

थकीत कर परिवहन कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन किंवा parivahan.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन कर भरता येणार आहे. वाहनधारकांनी थकीत करांचा भरणा केला नाहीतर, त्यांच्या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे, असेही त्यांनी कळविले आहे.