ब्रेकिंग
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून देवस्थानच्या कामांचा 30 कोटींचा निधी वितरित
आमदार सत्यजित तांबे यांचाही पाठपुरावा

संगमनेर । प्रतिनिधी । काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सततच्या पाठपुराव्यातून तालुक्यातील देवस्थानांच्या सुशोभीकरणासाठी मोठा निधी मिळवला होता. मात्र हा निधी काही काळ रखडला गेला होता. हा रखडलेला निधी पुन्हा त्वरित मिळण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. आणि आता या 30 कोटी रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले आहे.

मा. कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीमुळे संगमनेर तालुक्यातील तीर्थक्षेत्रांचा विकास वेगाने होत आहे. 2021 ते 2024 या कालावधीत तालुक्यातील विविध देवस्थानासाठी 30 कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आला होता. काही देवस्थानांना पहिल्या व दुसरा टप्पा वितरित करण्यात आला मात्र मोठा निधी रखडला होता. पुन्हा लोकनेते बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यामुळे आज सरकारने ३ कोटी 33 लाख रुपये संगमनेर तालुक्यातील देवस्थानांना वितरित करण्याचे आदेश दिले आहे. या अंतर्गत – श्री बिरोबा महाराज देवस्थान, तळेगाव दिघे – 2 कोटी रुपये, धांदरफळ खुर्द येथील श्री बिरोबा देवस्थान परिसर सुशोभीकरणासाठी – 19 लाख 39 हजार रुपये, साकुर – श्री विरभद्र देवस्थान परिसर सुशोभीकरणासाठी – 17 लाख 50 हजार रुपये, खांडगाव – कपालेश्वर मंदिर भक्त निवास बांधकामासाठी 50 लाख रुपये, जोर्वे – दत्त मंदिर देवस्थान परिसर विकासासाठी 17 लाख 50 हजार रुपये, ओझर खुर्द – नेमबाई माता मंदिर परिसर विकासासाठी 7 लाख 16 हजार रुपये, कोल्हेवाडी – काशी विश्वेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी 7 लाख 50 हजार रुपये, निंबाळे – मोठे बाबा मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी 7 लाख 25 हजार रुपये, अंभोरे – विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी 7 लाख रुपये असा मोठा निधी वितरीत करण्यात आला आहे.

सदर कामाला लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून आता पुन्हा सुरुवात होणार असून या सुशोभीकरणामुळे तालुक्यातील देवस्थाने अधिक सुंदर होणार असून ते मोठे पर्यटन स्थळ व भाविकांचे श्रद्धास्थान ठरणार आहे. तरी हा प्रलंबित निधी पुन्हा मिळाल्याबद्दल तालुक्यातील तळेगाव दिघे, धांदरफळ खुर्द, साकुर, खांडगाव, जोर्वे, ओझर खुर्द, कोल्हेवाडी, निंबाळे, अंभोरे या गावातील नागरिकांनी लोकनेते बाळासाहेब थोरात व आ सत्यजीत तांबे यांचे आभार मानले आहे.