ब्रेकिंग
मालपाणी उद्योग समूहाच्या प्रगतीत कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान – आमदार सत्यजित तांबे
मालपाणी उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांशी संवाद

संगमनेर । प्रतिनिधी । लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा परिवार आहे. आणि या परिवारात मालपाणी परिवार हा घटक अत्यंत महत्त्वाचा असून मालपाणी परिवाराचे संगमनेरच्या विकासात मोठे योगदान असल्याचे गौरव उद्गार आमदार सत्यजित तांबे यांनी काढले असून मालपाणी उद्योग समूहाच्या यशामध्ये कामगारांचे महत्त्वाचे योगदान असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मालपाणी उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांची संवाद साधताना ते बोलत होते यावेळी समवेत उद्योगपती राजेश मालपाणी, मनीष मालपाणी,गिरीश मालपाणी डॉ मैथिलीताई तांबे, आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, संगमनेर शहर व तालुका हा आपला परिवार आहे या परिवाराच्या विकासात मालपाणी परिवार हा कायम लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. स्वर्गीय ओंकार शेठ भाऊ मालपाणी माधव शेठ मालपाणी यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा पुढे कायम आहे. संगमनेर शहराच्या विकासात मालपाणी परिवाराची मोठी योगदान आहे या परिवाराने गुणवत्तेतून राज्यभरात आपला लौकिक निर्माण केला असून मालपाणी उद्योग समूहाच्या यशामध्ये कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. या सांघिक कामातून संगमनेरचा लौकिक वाढत असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.

तर राजेश मालपाणी म्हणाले की आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर शहरासाठी 2.0 हे व्हिजन मांडले आहे. राजकारण विरहित सर्वांना सामावून घेणारी संगमनेर सेवा समिती असून आधुनिक योजनांसह संगमनेर शहर हायटेक बनवण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांचा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद असून सर्वांनी सेवा समितीच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी गिरीश मालपाणी मनीष मालपाणी यांनीही मनोगत व्यक्त केली तर डॉ.मैथिलीताई तांबे यांनी आगामी काळातील संगमनेर याबाबत मालपाणी उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मनीष मालपाणी यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. यावेळी मालपाणी उद्योग समूहातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.