संवत्सर येथील ज्येष्ठ कार्यकर्ते चांगदेवराव भोसले यांचे निधन
संवत्सर येथील ज्येष्ठ कार्यकर्ते चांगदेवराव भोसले यांचे निधन
कोपरगाव । प्रतिनिधी ।
कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील पढेगांव रस्त्यावरील रहिवासी, ज्येष्ठ कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी चांगदेवराव बाबुराव पा. भोसले यांचे रविवार दि. १ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ८ वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी ते ६८ वर्षाचे होते. सोमवारी (दि. २ डिसेंबर) सकाळी संवत्सर येथील गोदावरी काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातून मोठा जनसमुदाय उपस्थित होता.कै. चांगदेवराव भोसले यांचा प्रगतशील शेतकरी म्हणून लौकीक होता. स्व. दिवंगत नेते नामदेवराव परजणे आण्णा यांचे विश्वासू सहकारी म्हणून आण्णांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रात भरीव योगदान दिले. मनमिळावू व धार्मिक स्वभावामुळे त्यांनी समाजात आदराचे स्थान मिळविले होते. परिसरात ते पप्पा म्हणून सर्वाच्या परिचित होते. त्यांचे थोरले चिरंजीव संतोष यांचे दि. २९ ऑगस्ट २०२२ रोजी निधन झालेले असून आता कै. चांगदेव पा. भोसले यांच्यामागे योगेश हे चिरंजीव, पत्नी, सुना, नातवंडे, मुलगी सुवर्णा गवळी असा परिवार आहे. संवत्सर येथे गोदावरी काठावर कै. भोसले अंत्यसंस्कार करण्यात आलेत. अनेकांनी कै. भोसले पाटील यांना आदरांजली वाहिली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी भोसले कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कै. चांगदेवराव भोसले यांच्या निधनामुळे संवत्सर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.