सुप्रसाध हॉस्पिटलमध्ये डायलिसिस सेंटरचा शुभारंभ
सुप्रसाध हॉस्पिटलमध्ये डायलिसिस सेंटरचा शुभारंभ
कोपरगाव । प्रतिनिधी । कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील डॉ कोळपे नॉलेज सिटी संचलित सुप्रसाध मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले असल्याची माहिती डॉ कोळपे नॉलेज सिटी चे संस्थापक डॉ प्रकाश कोळपे यांनी दिली आहे.ग्रामीण भागातील सर्वच गरजू रुग्णांना डॉ. कोळपे नॉलेज सिटी चे सुप्रसाध हॉस्पिटल वरदान ठरत असून हॉस्पिटलमध्ये सर्वोत्कृष्ट काळजी सर्वोत्तम उपचार या ब्रीद वाक्यानुसार हॉस्पिटलला वाढत चाललेला प्रतिसाद बघता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत डायलिसिस सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून तरी जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या सुप्रसाद हॉस्पिटल मधील या अत्याधुनिक सोयी सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र निकम यांनी केले आहे.
मंगळवार दि ३ डिसेंबर रोजी सुप्रसाध हॉस्पिटलमध्ये डॉ.कोळपे नॉलेज सिटी चे डॉ.प्रकाश कोळपे, डॉ.प्रदीपकुमार जोंधळे, डॉ.यशोधन पितांबरे, डायलिसिस टेक्निशियन रणजीत जोंधळे, हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र निकम आदींच्या उपस्थितीत या डायलिसिस मशिनचा शुभारंभ करण्यात आला