ब्रेकिंग

साहेब तुम्ही आमच्या हृदयात , नागरिक व तरुणांनी दिली भावनिक साद

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या भेटीने धांदरफळवासीय गहिवरले

साहेब तुम्ही आमच्या हृदयात ,
नागरिक व तरुणांनी दिली भावनिक साद

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या भेटीने धांदरफळवासीय गहिवरले

संगमनेर । प्रतिनिधी ।
 लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी 40 वर्षांच्या अविष्रांत कामातून उभा केलेला वैभवशाली संगमनेर तालुका हा देशासाठी दिशादर्शक ठरला आहे. निवडणुकीचा निकाल हा अनपेक्षित असून आम्हाला तो निकाल मान्य नाही . साहेब तुम्ही आमच्या हृदयात आहात असे नागरिक व युवकांनी सांगताना धांदरफळ सह कोकणीवाडी येथील उपस्थित सर्व ग्रामस्थ गहिवरले

लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात धांदरफळ बुद्रुक , पिंपळगाव कोंजीरा व कोकनेवाडी येथील नागरिकांशी संवाद साधला यावेळी समवेत विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित नागरिकांनी माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांना पाहून सर्व नागरिक गहिवरले .यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की हा तालुका बाळासाहेब थोरात यांच्या कष्टातून उभा राहिला आहे. निवडणुकीचा निकाल हा तालुक्यातील कोणत्याही व्यक्तीला किंवा युवकाला मान्य नसून तुम्हीच आमचे लोकप्रतिनिधी आहात.यानंतर बोलताना माजी मंत्री थोरात म्हणाले की, संघर्ष आपल्या तालुक्याला नवीन नाही .१९८९ मध्ये भंडारदराच्या पाण्यासाठी संघर्ष केला आणि 30% राखीव पाणी मिळवले. दुष्काळी भागाला वरदान ठरणारे निळवंडे धरण अनेक अडचणीवर मात करून पूर्ण केले. कोरोना संकटातही कालव्यांची कामे सुरू ठेवली. आज उजव्या आणि डाव्या कालव्यातून सर्वांना पाणी देता येईल अशी परिस्थिती आहे. हे सर्व निर्माण करताना संगमनेर तालुक्यातील जनतेची मोठी साथ आपल्याला लाभली आगामी काळामध्ये कालव्यामधून वरच्या बाजूला असलेल्या लोकांना पाणी देण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे आणि ते आपल्यालाच करावी लागणार आहे.मागील पूर्ण वर्षांमध्ये तालुक्यातील व शहरातील अनेक मोठमोठ्या विकास कामांसाठी आपण निधी मंजूर करून ठेवला आहे. येणाऱ्या काळातही आपण केलेल्या चांगल्या कामामुळे कधीही अडचण येणार नाही. मात्र आता गाव पातळीवरील मतभेद सर्वांनी दूर ठेवायचे आहेत.आपल्या तालुक्याची बसलेली घडी राजकारणाची पद्धत सुसंस्कृत व आदर्श वातावरण नीट ठेवण्यासाठी आपल्याला जोमाने काम करावे लागणार आहे .काही बाह्यशक्ती तालुक्यातील सहकारी संस्था अडचणीत आणण्याबरोबर विकास रोखण्यासाठी आता आणखी उद्योग करतील. त्यांना आपल्या सर्वांना एकही रोखायचे आहे.

 आपल्या सर्वांचे प्रेम हीच माझी ताकद असून यापुढील काळातही आपण सर्वांना सोबत घेऊन आपल्या विकासाची समृद्ध वाटचाल सुरू ठेवूया असेही त्यांनी सांगितले.यावेळी धांदरफळ बुद्रुक, पिंपळगाव कोंझिरा व कोकणेवाडी येथील युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!