ब्रेकिंग

सत्ता असो वा नसो बाळासाहेब थोरात हे आमचे नेते – रामदास गोंदके

सत्ता असो वा नसो बाळासाहेब थोरात हे आमचे नेते – रामदास गोंदके

बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून आदिवासी वाडीवस्त्यांना पाणी व्यवस्था सुरळीत

संगमनेर (प्रतिनिधी)–पठार भागातील अनेक वाडी वस्त्यांच्या विकासासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने निधी दिला आहे. वाडी वस्तीवर पिण्याचे पाणी, रस्ते, लाईट या सुविधा निर्माण करताना नागरिकांना चांगले जीवनमान मिळावे यासाठी त्यांनी सदैव काम केले. हिवरगाव पठारच्या गि-हेवाडी, सुतारवाडी , पायरवाडी येथील नागरिकांना पिण्याचे चांगले पाणी मिळावे याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीच पाईपलाईन योजना सुरू वीज पंप बंद पडल्याने काही दिवस अडचणी निर्माण झाल्या या अडचणी लक्षात घेऊन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी या गावांना पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तातडीने सूचना दिल्याने ग्रामस्थांच्या मदतीने या तीनही वाड्यांवर पिण्याचे पाणी मिळाले आहे. मात्र ज्यांना अद्याप गावही आणि वाडीही माहित नाही असे नवीन आमदार बातम्या देऊन जनतेमध्ये भ्रम निर्माण करत असल्याची घनाघाती टीका सरपंच सुप्रिया मिसाळ यांनी केली आहे.

हिवरगाव पठार येथील सुतारवाडी पायरवाडी व गि-हेवाडी या गावांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेवरून उपसरपंच दत्तात्रय वनवे, ग्रामसेवक विजय आहेर, रामदास गोंदके, सोपान डोळझाके, भाऊसाहेब नागरे, प्रकाश मिसाळ, बाळू दुधवडे, रावसाहेब पवार यांनी तातडीने विशेष परिश्रम घेऊन विद्युत पंप सुरू करून ही पाणीपुरवठा योजना सुरळीत केली.याबाबत सरपंच सुप्रिया मिसाळ व उपसरपंच वनवे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, काही ठिकाणाहून आमच्या गावातील वाड्यांसाठी पाणी नवीन आमदाराने दिले अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या .ज्या व्यक्तीला अजून आमचे गाव माहित नाही .वाड्या माहिती नाही. त्याने काय केले हा मोठा प्रश्न आहे.हिवरगाव पठारच्या गि-हेवाडी, पायरवाडी , सुतारवाडी यामधील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळावा याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने विविध योजनांच्या माध्यमातून विकास कामे राबवली आहेत. थेट सुतारवाडी पर्यंत उंच भागावर पाणी पोहोचवण्यासाठी त्यांनी काम केले आहे. विद्युत पंपात बिगड झाल्याने काही दिवस पाणी देता येत नव्हते याकरता आम्ही लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे स्थानिक ग्रामस्थांनी पाठपुरावा केला.याची दखल घेऊन यशोधन व संबंधित यंत्रणेने या कामी पाठपुरावा केल्याने तातडीने आमचा विद्युत पंप सुरू झाला. आणि त्यातून आम्ही ग्रामस्थांना पाणी दिले.यावेळी गावातील विविध ग्रामस्थ उपस्थित होते. ही पाणीपुरवठा योजना सुरळीत झाल्याने पायलवाडी सुतारवाडी व गि-हेवाडीतील नागरिकांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करत आनंद व्यक्त केला आहे.
सत्ता असो वा नसो बाळासाहेब थोरात हे आमचे नेते आहे. आणि त्यांच्या माध्यमातून सातत्याने काम होत असतात आणि होत राहील. मात्र ज्यांना अद्याप हिवरगाव पठार माहित नाही ज्यांना या वाड्या माहिती नाही ते संगमनेर मध्ये बसून बातम्या देत आहे हे कितपत योग्य आहेत.
आमची एक अपेक्षा आहे की तुम्ही नवीन काहीतरी करून दाखवा नवीन निधी आणून दाखवा जुने सर्व कामे ही बाळासाहेब थोरात यांनी मंजूर केली आहे आणि त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत. —
रामदास गोंदके ,नागरिक गि-हेवाडी



आमच्या गावात लाईट व पाणी देणारे हे आमदार थोरातच – लक्ष्मीबाई वनवे

आम्ही अगदी डोंगर भागात राहतो. पठार भागात राहतो .आम्हाला अनेक दिवस लाईट नव्हती. ही लाईट ,रस्ता पाणी देण्याचे काम आमचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे
इथे नवीन कोण आहे हे आम्हाला माहित नाही .आम्ही यापुढेही काहीही लागले तरी बाळासाहेब थोरात यांच्याकडे जाणार असल्याचे वृद्ध महिला लक्ष्मीबाई वनवे यांनी सांगितले आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!