जि. प प्राथमिक शाळा बहादराबाद येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
जि. प प्राथमिक शाळा बहादराबाद येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
कोपरगांव । विनोद जवरे ।
आज २६ जानेवारी २०२४ रोजी जि प प्राथमिक शाळेत ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वज हाती घेत,राष्ट्रभक्तीपर घोषणा देत गावातून प्रभातफेरी काढली.या प्रभातफेरी दरम्यान विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत कार्यालय बहादराबाद येथे उपस्थित राहत तेथील ध्वजास मानवंदना दिली तसेच स्वातंत्र्यसैनिक कोनशिलेवर सुमनांजली अर्पण करत सामुहीक राष्ट्रगीत घेतले.तदनंतर जि प प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक श्रीम स्वाती गुळवे मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यानंतर विद्यार्थ्यांनी इंग्रजी तसेच मराठी भाषेत अतिशय उत्कृष्ट भाषणे करत प्रजासत्ताक दिनाचे महत्व विशद केले.आपल्या राज्यघटनेचा मसुदा,घटना समितीची कार्ये,घटनेने दिलेले मुलभूत अधिकार इ.विषयांवर बोलत विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांची मने जिंकली.
यावेळी कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख मान्यवर मेजर योगेश पाचोरे यांचा शाळेच्या वतीने श्रीयुत सचिन तारडे सर यांनी यथोचित सन्मान केला.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच सौ अश्विनी पाचोरे यांनी भूषविले. यावेळी मेजर योगेश पाचोरे,मा सरपंच विक्रम पाचोरे,व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ सोनाली पाचोरे,सरपंच अश्विनी पाचोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी व्यवस्थापन समिती सदस्यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत शाळेस दहा खुर्च्या भेट देऊन लोकसहभागाची परंपरा कायम राखली.यावेळी विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तसेच आभारप्रदर्शन मुख्याध्यापक श्रीम स्वाती गुळवे मॅडम यांनी केले.यावेळी पोलिस पाटील आप्पासाहेब पाचोरे,मा चेअरमन दत्तात्रय पाचोरे,उपसरपंच गिताराम पाचोरे,सदस्य आरती पाचोरे,ग्रामसेवक अनिता दिवे मॅडम,शिवाजी पाचोरे,रामनाथ पाचोरे,काकासाहेब पाचोरे,सोमनाथ पाचोरे,बाजीराव पाचोरे,मोहन पाचोरे,संभाजी पाचोरे,गणेश पाचोरे,पाटीलबा पाचोरे,गोवर्धन पाचोरे,अंगणवाडी सेविका सुलोचना पाचोरे,संगिता पाचोरे,उषाताई पाचोरे,कुसुम पाचोरे,निर्मला पाचोरे,चंद्रकला पाचोरे,दिपक आरोटे,हिरामण माळी,प्रवीण खंडिझोड,प्रविण घारे,अशोक सरवार यांसह विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.