परभणीतील सूर्यवंशी कुटुंबीयांचे खा. राहुल गांधी व मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले सांत्वन
परभणीतील घटनेची निपक्ष चौकशी होऊन सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळावा - बाळासाहेब थोरात
परभणीतील घटनेची निपक्ष चौकशी होऊन सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळावा – बाळासाहेब थोरात
संगमनेर (प्रतिनिधी) – संविधान अवमान प्रकरणात भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीमध्ये झालेला मृत्यू हा संशयास्पद आहे. या घटनेची निपक्षपाती चौकशी होऊन या कुटुंबाला न्याय मिळावा. तसेच बीड, परभणी सह संसदेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातील वक्तव्य ही भाजपची मानसिकता असून या विरोधात मोठे जनआंदोलन करावे लागेल असे काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.परभणी येथे दलित युवक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी समवेत प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला ,माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार विजय वडेट्टीवार, डॉ.नितीन राऊत, अमित देशमुख ,यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे, खासदार प्रणिती शिंदे, खासदार वर्षा गायकवाड, खासदार रवींद्र चव्हाण, खासदार संजय जाधव, माजी मंत्री सुरेश वरपुडकर आदींसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना खासदार राहुल गांधी म्हणाले की, परभणीतील तरुण सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानाचे रक्षण करणारा युवक होता. तो दलित असल्याने त्याची हत्या करण्यात आली आहे .हा पोलीस कोठडीतील मृत्यू असून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.याप्रसंगी त्यांनी वीस ते पंचवीस मिनिटं सूर्यवंशी कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचे सात्वन केले.तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, परभणीतील झालेली घटना देशाच्या दृष्टीने काळजीची आहे. या गरीब युवकाचा पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यू ही चिंतेची गोष्ट आहे. हा मृत्यू आहे की हत्या असा मोठा संशय असून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्याची चौकशी व्हावी व कुटुंबाला न्याय मिळावा.नागपूर येथे झालेल्या अधिवेशनात काँग्रेसच्या वतीने जोरदार बाजू मांडण्याचा प्रयत्न झाला. परंतु सत्ताधाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. परभणी येथील घटना, बीड येथील सरपंचाची हत्या याचबरोबर देशाच्या सर्वोच्च सभागृहात केंद्रीय गृहमंत्री यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेली वक्तव्य हे सत्ताधाऱ्यांची मानसिकता दर्शवते आहे. जाती धर्माच्या नावावर ते समाजात विष कालवत असून या युवकाने दिलेले बलिदान जनतेने विसरू नये. पुरोगामी विचारांकडे पाहण्याची भाजपची दृष्टी दुर्दैवी असून या मानसिकते विरुद्ध काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात आणि देशात आंदोलन सुरू आहे. देशाची राज्यघटना संविधान टिकवण्यासाठी भाजपच्या मानसिक ते विरुद्ध मोठे जन आंदोलन उभे करावे लागेल असे ते म्हणाले यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की परभणी आणि बीड प्रकरणी मुख्यमंत्र्याविरोधात विशेष अधिकार प्रस्ताव आणू
याप्रसंगी सर्व नेत्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.



