ब्रेकिंग

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी  पिंपळगाव देपाच्या जळीत झालेल्या कुटुंबीयांना दिली भेट

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी  पिंपळगाव देपाच्या जळीत झालेल्या कुटुंबीयांना दिली भेट

संगमनेर (प्रतिनिधी) पिंपळगाव देपा येथे काल अभंग कुटुंबीयांच्या घराला लागलेल्या आगीतून मोठे नुकसान झाले यानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात व युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात यांनी तातडीने या कुटुंबीयांना भेट दिली असून यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून पिंपळगाव देपा येथील काल जळीत झालेल्या अभंग कुटुंबीयांना तातडीची मदत म्हणून संसार उपयोगी साहित्य, किराणा व घरगुती वापराची भांडी देऊन मदत करण्यात आली.

पिंपळगाव देपा येथे अभंग कुटुंबीयांची भेट घेऊन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सर्व माहिती जाणून घेतली यावेळी समवेत डॉ. जयश्रीताई थोरात,आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, सरपंच अलका मिंडे, ज्ञानदेव रावसाहेब मिंडे, संतोष घाणे बाबासाहेब गांजवे ,लक्ष्मण खेमनर, साहेबराव हजारे, शिवाजी हजारे,पाराजी हजारे,साहेबराव अभंग, जनसेवक रोहिदास नागरे, सतीश शेजवळ आदी उपस्थित होते.पिंपळगाव देपा येथील कारभारी अभंग यांच्या घराला आग लागली. यात सोन्याचे तीन लाख 25 हजार रुपयांचे दागिने, एक लाख 75 हजार रुपये रोख रक्कम, 15 पोते धान्यांसह सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. यामुळे हे कुटुंब मोठ्या संकटात सापडले. या दुर्दैवी घटनेचे वृत्त समजताच बीड येथे देशमुख कुटुंबियांच्या सांत्वनासाठी गेलेले लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी व युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात यांनी यशोधन कार्यालयास तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या. व या कुटुंबीयांना मदतीसाठी किराणा व इतर साहित्य पाठवण्यात आले.याच बरोबर माजी मंत्री बाळासाहेब थोरात व डॉ जयश्रीताई थोरात यांनी या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका हा परिवार मानला आहे. ते सदैव प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखात सहभागी आहेत. जीवनामध्ये अनापेक्षित पणे काही घटना घडतात .मात्र त्याला खंबीरपणे सामोर गेले पाहिजे. अभंग कुटुंबीयांनी नवीन घर बांधण्यासाठीचे स्वप्न ठेवले . मात्र काल लागलेल्या आगीतून कुटुंबीयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाकडून विविध स्तरावरून मदत मिळवण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून आपण पाठपुरावा करू असे त्या म्हणाल्या.यावेळी बोलताना आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात संगमनेर तालुक्याची कुटुंबप्रमुख आहेत . त्यांनी सातत्याने वाडी वस्तीवरील गोरगरिबांच्या मदतीसाठी  कायम काम केले आहे. नवीन घर बांधण्याचे स्वप्न असलेल्या अभंग कुटुंबीयांसोबत झालेली ही घटना दुर्दैवी आहे. काही दिवसांपूर्वी सावरगाव घुले येथील बेलसोंडा येथेही अशीच घराला आग लागून त्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले होते. आणि आज अभंग कुटुंबाचे नुकसान झाले आहे या कुटुंबीयांना यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू असे ते म्हणाले. यावेळी पिंपळगाव देपा गावातील विविध कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तालुक्याचे कुटुंबप्रमुख माजी मंत्री बाळासाहेब थोरात व डॉ जयश्रीताई थोरात यांनी दिलेल्या भेटीने व दिलेल्या दिलासाने अभंग कुटुंबीय व पिंपळगाव देपा ग्रामस्थ भारावून गेले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!