ब्रेकिंग

चंदनापुरी विद्यालयात 50 वर्षांनी एकत्र आले माजी विद्यार्थी

चंदनापुरी विद्यालयात 50 वर्षांनी एकत्र आले माजी विद्यार्थी

संगमनेर ( प्रतिनिधी ) जीवनाचा प्रवास हा न थांबणारा आहे परंतु प्रत्येकाच्या जीवनातील आठवणी हा त्याच्या जीवनातील महत्त्वाचा ठेवा असून शालेय आठवणी हा तर अनमोल ठेवा असतो पन्नास वर्षांपूर्वी एकत्र खेळले बागडलेले अनेक विद्यार्थी एकत्र आल्याने त्यांनी पन्नास वर्षांपूर्वीचे जीवन अनुभवले हा एक अद्भुत सोहळा सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.

चंदनापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयात १९७६-७७ मधील इयत्ता दहावीच्या बेचे विद्यार्थी एकत्र येऊन त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी मा.पर्यवेक्षक आर जी पावसे ,शिवाजीराव नवले ,विद्यमान प्राचार्य खेमनर, माजी विद्यार्थी गणपत पानसरे ,रावसाहेब सातपुते, सौ शांता थिटमे , नंदा कडने, तारा फटांगरे, हिराबाई भोर, प्रतिज्ञा दिवटे, लहान भाई खैरनार, दगडू देवके, दंडकारण्य अभियानाचे बाळासाहेब उंबरकर, विठ्ठल राहणे ,रावसाहेब राहणे, बाळासाहेब राहणे, सावळेराम राहणे, सोपान वाळे ,जालिंदर थिटमे, भाऊसाहेब नेहे, वसंत नेहे, संपत थिटमे गोरक्ष पावशे यादव पावशे सोपान पावसे बाळासाहेब सरोदे शिवाजी राहणे प्रवीण दिवटे आदींसह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी या माजी विद्यार्थ्यांनी नवीन शाळेची इमारत पाहताच त्यांना आपल्या जुन्या इमारतीतील दिवस आठवले .पन्नास वर्षांनी एकमेकांना भेटल्यानंतर अनेकांचे चेहरे बदलले अनेकांची ओळख पटने अवघड होते मात्र तोच जिव्हाळा तीच आपुलकी असल्याने आम्ही सर्व एकत्र आल्याचे बाळासाहेब उंबरकर यांनी म्हटले.
यावेळी एकत्र आलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी कठीण परिस्थितीत आपण या ठिकाणी आलो आहोत हीच जाणीव आपल्या मुलाबाळांनाही करून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करताना शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सर्वांनी निरोप घेतला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!