ब्रेकिंग

कुंभारी येथे गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालयात तब्बल एकतीस वर्षानंतर भरली माजी विद्यार्थीची शाळा

कुंभारी येथे गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालयात तब्बल एकतीस वर्षानंतर भरली माजी विद्यार्थीची शाळा

कोपरगाव । प्रतिनिधी ।

प्रत्येक मनुष्य प्राण्यावर अनेक ऋण असतात,जसे की भारतमातेचे ऋण,मातृभूमीचे ऋण, आई -वडीलांचे ऋण,साधुसंतांचे ऋण आदि तसेच एक गुरुजनांचे ऋण असतात आणि त्यांच्या ऋणातुन मुक्त होण्यासाठी मनुष्य संधीची वाट पाहत असतो आणि संधी मिळताच संधीचे सोनं करण्याचा प्रयत्न करतं असतो.‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटीत तुष्टता मोठी ” या उक्तीप्रमाणे अशीच एक संधी १९९३ चे माजी. विद्यार्थी -विद्यार्थीनींना गुरूजनांप्रती मिळताच गुरू -शिष्य भेट घडवून आणली.

तालुक्यातील गुरूवर्य तुकाराम बाबा विद्यालय कुंभारी येथे १९९३चे इयत्ता दहावीचे माजी.विद्यार्थी-विद्यार्थीनींचा व गुरूजनांचा तब्बल एकतीस वर्षानंतर स्नेह मिलन सोहळा संपन्न झाला.सदर कार्यक्रमास श्री.गिरमे सर,पंडोरे सर,थोरात सर,निर्मळ सर,उगले सर, मनियार मामा व मुख्याध्यापक बागुल सर या गुरूजनांची प्रमुख उपस्थिती लाभली.तर कार्यक्रमाची सुरुवात सुंदर अशा शालेय प्रार्थनेने करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गिरमे सर यांच्या नावाची सुचना अरुण कदम यांनी मांडली त्यास अनुमोदन विजय घुले यांनी देऊन आदरणीय गिरमे सर यांना अध्यक्षस्थानी विराजमान करण्यात आले.

प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरमे सर यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास सर्व शिक्षक वृंदाच्या समवेत पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर वाळेकर यांनी केले.भारतीय संस्कृतीनुसार आलेल्या सर्व शिक्षकांचा शाल,बुके व ट्रॉफी देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर उपस्थित वर्गमित्र- मैत्रिणींना गेट-टुगेदर ची आठवण म्हणून ट्रॉफी देण्यात आली.यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थी कै.शहाजी चंदनशिव,दिलीप जाधव,रघुनाथ गायकवाड साहेब आणि शिक्षक चंद्रे सर, गायकवाड एल.एल.सर यांच्या अकाली निधनाबद्दल सर्वांच्या उपस्थितीत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व वर्गमित्र मैत्रिणींनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सुत्रसंचलन अनिल विधाते सर यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार नसीम मनियार यांनी मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!