माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते शॅम्प्रो संस्थेचे सन २०२५ दिनदर्शिकेचे प्रकाशन

संगमनेर ( प्रतिनिधी ) शेतकरी व बांधकाम व्यावसायिकांसाठी माफक दरात सेवा देणाऱ्या शॅम्प्रो या संस्थेने नव्याने तयार केलेल्या सन २०२५ या अद्यावत दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.
राजहंस दुध संघ कार्यस्थळावर या अद्यावत दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी दुध संघाचे चेअरमन रणजीत सिह देशमुख, कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ, शॅम्प्रो संस्थेचे चेअरमन आर.एम.कातोरे,व्हा.चेअरमन सुभाष सांगळे,अरुण ताजणे,शांताराम डुबे, वसंत साबळे,भारत वर्पे,तान्हाजी आहेर,दगडू लांडगे,भिमा राहींज,राधाकिसन देशमुख,साहेबराव तांबे,कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर,किरण कानवडे,बाळासाहेब नवले,बंडू थोरात, चांगदेव शेटे, शांताराम पानसरे,संजय थोरात,गोतम रोकडे,राहुल दिघे,सचिन गुंजाळ,दत्ता काळे,दत्तप्रसाद कोल्हे,बाबासाहेब गुंजाळ,भाऊसाहेब गुंजाळ,सुभाष मतकर,उत्तम वामने आदि उपस्थित होते.यावेळी थोरात म्हणाले कि, शॅम्प्रो ही संस्था शेतकरी, बांधकाम व्यावसायिक यांच्या मदतीची संस्था आहे.सहकारी तत्वावरील ही एकमेव संस्था असावी. या संस्थेने आधुनिकतेकडे वाटचाल केली असून शेतकऱ्यांना उपयोगी पडणाऱ्या माहितींचे संकलन ही या दिनदर्शिकेत केले आहे. या संस्थेची दिनदर्शिका ही दरवर्षी प्रमाणे दर्जेदार झाली आहे.
या दिनदर्शिकेचे ग्रामीण भागातून स्वागत होत आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन रामहरी कातोरे यांनी केले तर सुभाष सांगळे यांनी आभार मानले.