ब्रेकिंग

सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज महिला सक्षम – सौ दुर्गाताई तांबे

माळीवाडा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती    उत्साहात साजरी

सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज महिला सक्षम – सौ दुर्गाताई तांबे

माळीवाडा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती    उत्साहात साजरी
 संगमनेर । प्रतिनिधी । महिलांना शिक्षण मिळावे, त्या शिक्षित व्हाव्या यासाठी स्वतः अंगावर दगड गोटे, शेण व प्रचंड सामाजिक रोष झुगारून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शैक्षणिक क्रांतीचे पाऊल सुरूच ठेवले. सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज महिला सक्षम झाल्या असल्याचे गौरवोद्गार सौ दुर्गाताई तांबे यांनी काढले.
जाहिरात

तालुक्यातील माळीवाडा येथे विविध प्रतिष्ठानच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रमिला अभंग, आयोजक सुवर्णा ताजने, बाळासाहेब ताजणे, सुनिताताई माताडे, रूपाली मेहेर, किशोर ढोले, अरुण ताजने, अर्चना चिपाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
     यावेळी दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिक्षण घेणे खूप अवघड होते. पुरुषप्रधान संस्कृती असल्याने चूल आणि मूल हेच स्त्रीचे जीवन होते. मात्र अनेक सामाजिक विरोध स्वीकारत महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षण मिळावे, त्या शिक्षित व्हाव्या व समाज शिक्षित व्हावा यासाठी पुण्यातील भिडे वाडा येथे मुलींची शाळा काढली. व महिलांना शिक्षण देण्याची काम केले. आज महिला वेगवेगळ्या क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने यशस्वी आहे याचे श्रेय सावित्रीबाई फुले यांनाच आहे. ज्योतिबा फुले यांच्यासमवेत  सावित्रीबाई फुले यांनी  महिला हक्क आणि शिक्षणासाठी अथक परिश्रम घेतले. मुलींच्या शाळेत सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांना आधुनिक मराठी महाकाव्याचे सूत्रधार मानले जाते. १८५२ मध्ये त्यांनी अस्पृश्य मुलींसाठी एक अकादमी स्थापन केली.


    काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातही महिला सक्षमीकरण व सबलीकरण होण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचेही ते यावेळी म्हणाल्या.
   या कार्यक्रमासाठी मारुती देवस्थान, महिला उत्सव समिती, महात्मा फुले युवा प्रतिष्ठान, सावित्रीच्या लेकी प्रतिष्ठान, आशीर्वाद पतसंस्था, महात्मा फुले नागरी पतसंस्था यांचेही विशेष सहकार्य लाभले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!