ब्रेकिंग

भारतीय जनता पक्षाचे राज्‍यस्‍तरीय आधिवेशन१२ जानेवारी रोजी शिर्डी येथे होणार – मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील

भारतीय जनता पक्षाचे राज्‍यस्‍तरीय आधिवेशन१२ जानेवारी रोजी शिर्डी येथे होणार – मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील

या आधिवेशनास पक्षाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष मंत्री जे.पी नड्डा, केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह, मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍यासह राज्‍यातील मान्‍यवर नेते उपस्थित राहणार

शिर्डी । प्रतिनिधी ।

जिल्‍ह्यामध्‍ये महायुतीला मिळालेल्‍या विजया प्रमाणेच शिर्डीमध्‍ये पक्षाचे होत असलेले आधिवेशन एैतिहासिक करुन, आगामी स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थाच्‍या निवडणूकीतही जिल्‍ह्यामध्‍ये शतप्रतिशत भाजपाच्‍या विजयाचा निर्धार करण्‍याचा संकल्‍प करु असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

जाहिरात

भारतीय जनता पक्षाचे राज्‍यस्‍तरीय आधिवेशन येत्‍या १२ जानेवारी रोजी शिर्डी येथे संपन्‍न होत आहे. या आधिवेशनास पक्षाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष मंत्री जे.पी नड्डा, केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह, मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍यासह राज्‍यातील मान्‍यवर नेते उपस्थित राहणार आहेत. राज्‍यात महायुतीची सत्‍ता स्‍थापन झाल्‍यानंतर आणि भारतीय जनता पक्षाला प्रथम क्रमांकाने मिळालेल्‍या जागा यासर्व वातावरणात शिर्डीमध्‍ये होत असलेले आधिवेशन अधिक उत्‍साहाने करण्‍याचा निर्णय पक्षाच्‍या प्रदेश कार्यकारणीने घेतला आहे.या पार्श्‍वभूमीवर शिर्डी येथे आधिवेशनाची नियोजन आढावा बैठक संपन्‍न झाली. या बैठकीस ना.राधाकृष्‍ण विखे पाटील, पक्षाचे महामंत्री आ.विक्रांत पाटील, आ‍.शिवाजीराव कर्डीले, महामंत्री विजयराव चौधरी, राजेश पांडे, रवी अनासपुरे, श्रीमती माधवी नाईक, डॉ.सुजय विखे पाटील, सौ.स्‍नेहलता कोल्‍हे, जिल्‍हाध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग यांच्‍यासह जिल्‍ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

या राज्यस्‍तरीय आधिवेशनास पक्षाचे सुमोर वीस हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील अशा पध्‍दतीचे नियोजन करण्‍यात आले आहे. यासाठी आजच्‍या बैठकीत विविध समित्‍या गठीत करण्‍यात आल्‍या असून, या समित्‍यांकडे आधिवेशनातील विविध विभागांची जबाबदारी निश्चित करण्‍यात आली. आ.विक्रांत पाटील, माधीवी नाईक, विजयराव चौधरी, रवी अनासपुरे यांनी या बैठकी समि‍त्‍यांना मार्गदर्शन करुन आधिवेशनाचे नियोजन चांगल्‍या प्रकारे करण्‍याचे आवाहन केले. नुकत्‍याच मिळालेल्‍या विजयाच्‍या पार्श्‍वभूमीवर तसेच अगामी स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थाच्‍या निवडणूकीची रणनिती या आधिवेशनात ठरविली जाणार असल्‍याने या आधिवेशनाला विशेष महत्‍व प्राप्‍त झाले आहे.बैठकीत मार्गदर्शन करताना ना.विखे पाटील म्‍हणाले की, पक्षाच्‍या राज्यस्‍तरीय नेत्‍यांनी या आधिवेशनाचे यजमानपद शिर्डीला दिल्‍याबद्दल आभार व्‍यक्‍त करुन, हे आधिवेशन न भूतो न भविष्‍यती अशा पध्‍दतीने आम्‍ही यशस्‍वी करु, विधानसभा निवडणूकीत महायुतीला ज्या पध्‍दतीने विजय मिळविला तसेच हे आधिवेशन सुध्‍दा एैतिहासिक करण्‍याचा प्रयत्‍न या जिल्‍ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते करतील अशी ग्‍वाही त्‍यांनी दिली.पक्षाच्‍या सर्व राज्‍यस्‍तरीय पदाधिका-यांनी आज राज्‍यातून येणा-या प्रतिनिधींच्‍या निवासस्‍थानाचे, भोजन व्‍यवस्‍था, पार्कींग व्‍यवस्‍था याचे नियोजन करुन, आधिवेशनाच्‍या प्राथमिक तयारीवर शिक्‍कामोर्तब केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!