ब्रेकिंग

विशेष श्रमसंस्कार शिबिरातून जबाबदारीची जाणीव होते – पोलीस उपअधीक्षक वमने

ठाकरे महाविद्यालयाचे वेस सोयगाव येथे श्रमसंस्कार शिबिराचे तिसरे वर्ष

विशेष श्रमसंस्कार शिबिरातून जबाबदारीची जाणीव होते – पोलीस उपअधीक्षक वमने

ठाकरे महाविद्यालयाचे वेस सोयगाव येथे श्रमसंस्कार शिबिराचे तिसरे वर्ष

कोपरगाव । प्रतिनिधी ।

मोबाईलचा अतिरिक्त वापर व सोशल मीडियाचा अतिरेक यामुळे तरुण भरकटत चालला आहे. शाळा महाविद्यालयात शिक्षण घेत असताना प्रत्येक स्पर्धेत सहभाग घेतला पाहिजे. यामुळे हिम्मत व जिद्द वाढते. ज्ञानाची कक्षा वाढते. जबाबदारीची जाणीव होण्याच्या दृष्टीनेच विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन शिर्डी उपविभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष वमने यांनी केले.

जाहिरात

ते कोपरगाव तालुक्यातील वेस सोयगाव येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व पोहेगांव येथील हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.यावेळी हिंदुहृदयसम्राट मान. बाळासाहेब ठाकरे महाविद्यालयाचे संस्थापक, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोकराव नवले, प्राचार्य शांतीलाल जावळे, सरपंच जयाताई माळी, उपसरपंच आनंदा भडांगे, गोपीनाथ कोल्हे, महाविद्यालयाचे प्रा.रविंद्र गायकवाड, प्रा. दिपक वाघमारे, प्राध्यापिका भावना गांधीले, प्रा. श्री भांड, श्री रोहमारे, प्राध्यापिका श्रीमती शोधक,सांगले एन पी,सुभाष भडांगे, सुभाष जुन्धारे, महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी महाविद्यालय संस्थापक नितीनराव औताडे यांनी सांगितले की सहकार महर्षी कै गणपतराव रभाजी औताडे यांनी ब्रिटिशांच्या काळामध्ये सहकाराचं रोपट लावलं , कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याची उभारणी केली , दिन दुबळ्यांना आधार दिला. त्यांचीच सामाजिक कामाची परंपरा पुढे सुरू राहावी म्हणून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाविद्यालयाची स्थापना केली. नूतन इमारतीचे काम सुरू असून c b sc ते 12 वी परवानगी मिळाली आहे. या महाविद्यालयामुळे परिसरातील मुलींना वमुलींना उच्च शिक्षण घेता आले असल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात

तर प्राचार्य शांतीलाल जावळे यांनी वेस सोयगाव येथे सलग तीन वर्ष राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत महाविद्यालयाच्या वतीने विशेष श्रम शिबिराचे सलग तीन वर्ष आयोजन करत गावच्या विकासाला हातभार लावला. वेस सोयगावच्या दोन प्रमुख रस्त्यावर शिवसेना नेते नितीनराव औताडे यांच्या पुढाकारातून वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती प्रा.बी एस गांधीले यांनी केले तर आभार डी एस वाघमारे यांनी मानले

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!