सरपंच भाऊराव राहणेचां राज्यपालांच्या हस्ते समाजभूषण आदर्श सरपंच पुरस्काराने गौरव
सरपंच भाऊराव राहणेचां राज्यपालांच्या हस्ते समाजभूषण आदर्श सरपंच पुरस्काराने गौरव
संगमनेर । प्रतिनिधी ।
मराठी वृत्तपत्र लेखक संघ, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळा सोमवार, दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, डॉ. सुरेंद्र गावसकर सभागृह, दादर येथे उत्साहात संपन्न झाला.या प्रसंगी सरपंच भाऊराव रंगनाथ राहणे यांना आदर्श सरपंच समाज भूषण पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या आदर्श कार्याचा सन्मान म्हणून हा पुरस्कार देण्यात आला. प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल तथा माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, सुकृत खांडेकर, भाऊ तोरसेकर, तुलसीदास भोईटे आणि संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांनी राहणे यांच्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक केले. त्यांनी समाजातील विविध क्षेत्रांत दिलेल्या सकारात्मक योगदानाचा उल्लेख करत त्यांना प्रेरणास्थान म्हणून संबोधले.