ब्रेकिंग
जोर्वे येथील एडीसीसी बँक कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक
जोर्वे येथील एडीसीसी बँक कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

संगमनेर । प्रतिनिधी ।
आशिया खंडातील अग्रगण्य समजली जाणारी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नेहमीच ग्राहकांच्या विश्वासात पात्र ठरत असून अनेक सर्वसामान्य, शेतकरी व इतर ग्राहक बँकेच्या कामकाजाबाबत समाधानी आहे.
आशिया खंडातील अग्रगण्य समजली जाणारी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नेहमीच ग्राहकांच्या विश्वासात पात्र ठरत असून अनेक सर्वसामान्य, शेतकरी व इतर ग्राहक बँकेच्या कामकाजाबाबत समाधानी आहे.

बँकेच्या जोर्वे शाखा येथे अनेक वर्षापासून लॉकर सुविधा उपलब्ध आहे. लॉकर ग्राहक संजय कारभारी काकड हे लॉकर हाताळताना नजर चुकीने त्यांच्या सोन्याचे साधारणतः 35 ग्राम (साडेतीन तोळे )वजनाचे गंठण लॉकर बाहेर विसरून राहिले. दरम्यान कॅशियर कुणाल साबळे यांच्या ते निदर्शनास आले व त्यांनी शाखाअधिकारी सचिन चत्तर यांना याविषयी कल्पना दिली. त्यांनी तात्काळ तालुका विकास अधिकारी अशोक थोरात यांना कळवले त्यांनी शाखेला भेट देऊन सदर पाकीट उघडले असतात त्या सोन्याचे गंठण आढळून आले त्यांनी वरिष्ठ कार्यालयाला कळून पुढील कार्यवाहीसाठी रीतसर परवानगी घेतली.त्यानंतर रीतसर खातर जमा करून सदरचा ऐवज मूळ मालक संजय कारभारी काकड यांना डॉ. जयश्रीताई थोरात व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सुपूर्त करण्यात आला. या घटनेमुळे बँक कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा दिसून आला. त्यांचे ग्रामस्थांकडून तसेच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ. सुधीर तांबे, आ. सत्यजित तांबे , बँकेचे व्हा. चेअरमन माधवराव कानवडेम, संचालक गणपतराव सांगळे , थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीतभाऊ थोरात, बँकेचे सीईओ रावसाहेब वर्पे , तालुका विकास अधिकारी अशोक थोरात यांनी कौतुक केले आहे.