पत्रकार दिनाचे औचित्य साधून साईतीर्थ थीम पार्कमध्ये विविध उपक्रमांची सुरुवात

पत्रकार दिनाचे औचित्य साधून साईतीर्थ थीम पार्कमध्ये विविध उपक्रमांची सुरुवात
शिर्डी (प्रतिनिधी) बाळशास्त्री जांभेकरांचे स्मरण करताना त्यांचा ज्ञानलालसेचा, चौफेर बुद्धिमत्तेचा गुण अंगीकारून वाटचाल केली तर खऱ्या अर्थाने पत्रकार दिन साजरा होईल असे प्रतिपादन डॉ. संतोष खेडलेकर यांनी केले. ते येथील साईतीर्थ थीम पार्क येथे आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
साईतीर्थ थीम पार्कच्यावतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून जगभरातल्या प्रेक्षकांसाठी नव्याने सुरु होत असलेल्या विविध उपक्रमांचा पत्रकारांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. थीम पार्कमध्ये नव्याने सुरु होत असलेला कालिया मर्दन हा फाईव्ह डी शो आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेला मूषक महाराज या शोजचे पत्रकारांसाठी आयोजन करण्यात आले होते. याचबरोबर राधा, कृष्ण आणि श्रीराम, सीता, हनुमानाच्या अत्याधुनिक जिवंत देखाव्याच्या तसेच नव्याने सुरु करण्यात आलेल्या बोलक्या बाहुल्यांच्या कार्यक्रमाचा शुभारंभ यावेळी पत्रकारांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विविध माध्यमातील पत्रकारांचा सर्वश्री डॉ. संतोष खेडलेकर, अनुप बजाज, सचिन डांगे, अशोक जेजुरकर, प्रबोध शिंदीकर आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दुर्गा माकोने, रोहित कराड सुनील गडगे, योगेश रहाणे, कैलास रुकारे, संदीप भुसे आदींनी विशेष परिश्रम घेतले.