ब्रेकिंग

एसएमबीटी हॉस्पिटलच्या वतीने आयोजित शिबिरास नागरिकांचा उदंड प्रतिसाद

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्त महाआरोग्य शिबिर संपन्न

एसएमबीटी हॉस्पिटलच्या वतीने आयोजित शिबिरास नागरिकांचा उदंड प्रतिसाद

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्त महाआरोग्य शिबिर संपन्न
संगमनेर ( प्रतिनिधी ) सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्त एसएमबीटी हॉस्पिटलच्या वतीने आज शहरातील प्रभाग एक मधील पीजे आंबरे पाटील कन्या विद्यालयात महाआरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास शहरातील नागरिकांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला. या शिबिरात मोफत उपचार घेण्यसाठी सकाळपासून अनेक रुग्णांनी गर्दी केली होती. अनेक रुग्णांवर शिबिरस्थळी उपचार करण्यात आले तर पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर इगतपुरी तालुक्यातील नंदी हिल्स येथील एसएमबीटी हॉस्पिटल येथे उपचारांसाठी नेण्याचा सल्ला तज्ञांकडून देण्यात आला.

अधिक माहिती अशी की, शहरातील नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी दर रविवारी विविध प्रभागात या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. १० पेक्षा अधिक प्रभागांमधील नागरिकांची मोफत आरोग्यतपासणी केली जाणार असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली.या शिबिरास काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजीमंत्री बाळासाहेब थोरात, जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक मा.आमदार डॉ.सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या शिबिरास भेट दिली.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून गोरगरिबांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती शताब्दीच्या निमित्ताने संगमनेर शहर आणि तालुक्यात विविध ठिकाणी हे महाआरोग्य शिबिर होत आहे यामध्ये विविध आजारांचे निदान व त्यावर उपचार होणार असल्याने या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.तर डॉ.तांबे म्हणाले की,  तालुक्यातील गोरगरीब ऊसतोड कामगार सर्वसामान्य नागरिक यांच्या आरोग्य सुविधांसाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दूरदृष्टीतून एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टची स्थापना केली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली एसएमबीटी हॉस्पिटलच्या माध्यमातून सातत्याने आदिवासी गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत व माफक दरात उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मोफत आणि परवडणाऱ्या आरोग्यसुविधा पुरवणारे एसएमबीटी हॉस्पिटलचा नावलौकिक महाराष्ट्रभरात आहे. राज्याच्या कानाकोपरयातून अनेक रुग्ण याठिकाणी उपचारासाठी दाखल होत आहेत. आपल्या शहरातील नागरिकांनादेखील मोफत उपचारांचा लाभ मिळावा या उदात्त हेतून अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येते.या शिबिरात जन्मजात हृदयविकार, हृदयविकार शस्रक्रिया, प्रतिबंधात्मक कर्करोग, मूत्रविकार, किडनी व डायलिसीस, जनरल शस्रक्रिया, अस्थिरोग, सांधेदुखी, पोटदुखी,  हाडांचे आजार स्त्रियांचे आजार, नेत्ररोग तपासणी व उपचार तसेच आयुर्वेद हॉस्पिटलच्या वतीनेदेखील विविध आजारांवरील रुग्णांची तपासणी करण्यात आली.
याप्रसंगी  एसएमबीटी सेवाभावी संस्थेचे बोर्ड मेंबर श्रीराम कुऱ्हे,  अधिष्ठाता डॉ. मीनल मोहगावकर, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सचिन बोरसे यांच्यासह अनेक वरिष्ठ  तज्ञांची उपस्थिती होती.शिबिराच्या मुख्य समन्वयक म्हणून डॉ अश्विनी देशमुख यांनी काम पहिले. एसएमबीटी दंत महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!